शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनकरांचा भूमाफियांना दणका

By admin | Updated: April 13, 2015 05:18 IST

उत्तन येथील शिरे मार्गावर असलेल्या ढोल्या कुुटंबाच्या जागेत भूमाफिया कुरेशी बंधुंनी बांधलेल्या बेकायदेशीर कुपणांवर स्थानिकांनी रविवारी हल्लोबोल करुन त्यांच्या कुंपणाला जमिनदोस्त केले.

भार्इंदर : उत्तन येथील शिरे मार्गावर असलेल्या ढोल्या कुुटंबाच्या जागेत भूमाफिया कुरेशी बंधुंनी बांधलेल्या बेकायदेशीर कुपणांवर स्थानिकांनी रविवारी हल्लोबोल करुन त्यांच्या कुंपणाला जमिनदोस्त केले.एमएमआरडीए (मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरण) मार्फत उत्तनसह आसपासच्या गावांना विशेष पर्यटन क्षेत्रात समाविष्ट केले आहे. यामुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने येथील भूमाफियांकडून जमीन हडपण्यास सक्रीय झाले आहेत. त्यात येथील बॉबी, शालु, लियाकत, नजाकत कुरेशी बंधुंचा समावेश असून त्यांच्यावर बेकायदेशीरपणे जमीन हडपल्याप्रकरणी अनेक गुन्हे स्थानिक पोलिसांत दाखल आहेत. ६ एप्रिल रोजी या कुरेशी बंधुंसह सुमारे १५ ते २० साथीदारांनी ओबेल ढोल्या यांच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीर कुंपण बांधण्यास सुरुवात केली होती. त्याचा जाब विचारणाऱ्या फिलोमीना ढोल्या (५५) व त्यांचा मुलगा डोसन (३५) यांना कुरेशी बंधुंसह त्यांच्या १५ ते २० साथीदारांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. यातील डोसन जबर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजुंकडून उत्तन-सागरी पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी कुरेशी बंधुंना अटक करून त्यांची त्वरीत जामिनावर मुक्तता केल्याने स्थानिकांत पोलिसांविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)