शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड मालकही ‘रेरा’च्या कक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:09 IST

एखादा भूखंड मालक बांधकाम प्रकल्पात व फ्लॅटविक्रीमध्ये सहभागी असेल, तर रिअल इस्टेट (रेग्युलेशन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) कायद्यात (रेरा) ‘प्रमोटर’ची जी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येत संबंधित भूखंड मालकही मोडतो

मुंबई : एखादा भूखंड मालक बांधकाम प्रकल्पात व फ्लॅटविक्रीमध्ये सहभागी असेल, तर रिअल इस्टेट (रेग्युलेशन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) कायद्यात (रेरा) ‘प्रमोटर’ची जी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येत संबंधित भूखंड मालकही मोडतो, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने उच्च न्यायालयात सोमवारी दिले.बांधकाम प्रकल्पात सहभागी असलेल्या भूखंड मालकाला ‘को-प्रमोटर’ बनविण्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मालाडमध्ये तीन एकर भूखंड असलेल्या मालकाच्या वतीने वकील गिरीश गोडबोले यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, प्राधिकरण निव्वळ एक कार्यकारी मंडळ असल्याने त्यांना ‘को-प्रमोटर’ची व्याख्या करण्याचा अधिकार नाही. ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अ‍ॅक्ट’ अंतर्गत भूखंड मालक पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीद्वारे जमिनीचा हक्क विकासकाला देतो. त्यामध्ये मालक ‘प्रमोटर’ असल्याचा उल्लेख नाही. या याचिकेवर उत्तर देताना महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हे स्पष्टीकरण दिले.विकासकांबरोबर विकास करारावर सही करणाºया भूखंड मालकाला किंवा संस्थेला संबंधित प्रकल्पातील ‘को-प्रमोटर’ म्हणून गृहित धरण्यात येईल, असे ११ मे रोजी ‘महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी आॅथॉरिटीने’ सूचित केले. फ्लॅटविक्री किंवा एकूण विकास केलेल्या क्षेत्राद्वारे मिळालेल्या महसुलाचा हिस्सा देणे भूखंड मालकासाठी बंधनकारक आहे. प्रमोटरच्या बरोबरीने ‘को-प्रमोटर’वर जबाबदाºया आहेत. त्यामुळे भूखंड मालक व संस्थेला ‘को-प्रमोटर’च्या व्याख्येत बसविले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे.उत्तर मागितले-‘रेरा’अंतर्गत नेमलेल्या प्राधिकरणाच्या वैधतेला डी. बी. रिअ‍ॅल्टी व अन्य काही बड्या विकासकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने ‘रेरा’ची व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे, असे म्हणत, केंद्र व राज्य सरकारला या याचिकांवर तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.