शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

जमीन भूमिपुत्रांची, मालक परप्रांतीय

By admin | Updated: November 5, 2016 03:04 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली

 नामदेव मोरे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्तांसह शैक्षणिक संस्थांनाही कारवाईची नोटीस दिली आहे. अनधिकृत तबेल्यांनी जवळपास १०० एकर जमीन गिळंकृत केली असून आतापर्यंत एकाही तबेल्यावर कारवाई केली नसल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांसह कारवाईमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीची स्थापना केली. ठाण्यामध्ये पहिल्या एमआयडीसीची पायाभरणी करण्यात आली व दिघा ते नेरूळपर्यंतची प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित करून टीटीसी औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली. येथील शेतकऱ्यांकडून १५०० ते ३ हजार रूपये एकरने जमीन संपादित केली. राज्याच्या औद्योगिक उभारणीची पायाभरणी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तक्रार न करता जमिनी शासनाला दिल्या. पण या जमिनीचा वापर अनधिकृत बांधकामांसाठीच जास्त झाला आहे. शहरातील ७० टक्के झोपड्या या एमआयडीसीच्या भूखंडावर उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे नेरूळ ते दिघापर्यंत तब्बल ९८ अनधिकृत तबेले सुरू आहेत. काही तबेले १० गुंठे तर काही दोन एकरवर पसरले आहेत. तब्बल १०० एकर जमिनीवर अतिक्रमण करून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून सद्यस्थितीमध्ये जवळपास २५०० गाई, म्हशींचा सांभाळ केला जात आहे. या व्यवसायासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केले असल्यामुळे बांधकाम परवानगीही घेतलेली नाही. पाण्यासाठी बोअरिंग व महापालिकेच्या नळजोडणीचा अनधिकृतपणे वापर सुरू आहे. शासनाच्या दुग्धविकास विभागाची परवानगीही घेतलेली नाही. दूधप्रक्रिया व्यवसाय करण्यासाठी अन्न व सुरक्षा विभागाचा परवानाही घेतलेला नसताना बिनधास्तपणे हे व्यवसाय सुरू आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व तबेल्यांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये सर्वच व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले आहे. बेकायदेशीर व्यवसाय थांबविण्यासाठी दुग्धनगरी उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांकडे सादर केलेला आहे. बेकायदेशीर तबेल्यांमधील गाई, म्हशी दुग्धनगरीमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी २० एकर जागा व ७५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे शहरातील अनधिकृत व्यवसाय पूर्णपणे बंद होणार आहे. याशिवाय जवळपास १०० एकर जमिनीवरील अतिक्रमण दूर होवून ती जागा उद्योगासाठी वापरता येवू शकते. पण हा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही आतापर्यंत याविषयी ठोस निर्णय घेतलेला नाही. प्रकल्पग्रस्तांनी १०० व २०० मीटर जमिनीवर केलेले बांधकाम तत्काळ हटविले जाते, मग या तबेल्यांवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.