शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोजणी पथक फिरकलेच नाही !

By admin | Updated: March 11, 2017 02:35 IST

समृद्धी महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध कायम; १४ मार्चला पार पाडली जाणार जमीन मोजणीची प्रक्रिया

वाशिम, दि. १0- नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन-वे अर्थात समृद्धी महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सद्या वेगात सुरू असून यासाठी लागणार्‍या १५00 हेक्टर जमिनीपैकी सुमारे १५२ एकर जमीनीची शुक्रवार, १0 मार्चला मोजणी होणार होती. तशाप्रकारच्या नोटिसा देखील शेतकर्‍यांना गुरूवारी देण्यात आल्या. मात्र, नियोजित स्थळी शेतकरी दिवसभर उपस्थित असताना जमीन मोजणी पथक त्याठिकाणी फिरकलेच नसल्याचा प्रकार घडला.विकासाचा मार्ग म्हणून गणल्या गेलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ४ तालुक्यांमधील ५२ गावांमधून जात आहे. यासाठी सुमारे १५00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. शेतकर्‍यांमधून मात्र या महामार्गासाठी जमीनी देण्यास विरोध अद्याप कायम असून भूसंचय आणि भूसंपादनाच्या बदल्यात मिळणार्‍या मोबदल्यासंबंधी शासनस्तरावरून जोपर्यंत ठोस धोरण अंगिकारले जात नाही, तोपर्यंत हा विरोध कायमच राहील, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. दरम्यान, उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून शेतकर्‍यांना ९ मार्चला नोटिसा देण्यात आल्या. १0 मार्चला सकाळी १0 वाजेपासून जमिनीची मोजणी होणार असून त्यासाठी संबंधितांनी उपस्थित राहण्याबाबत त्यात कळविण्यात आले होते. त्यानुसार, संबंधित जमिनधारक शेतकरी त्या-त्या नियोजित स्थळी अगदी वेळेवर हजर झाले. मात्र, जमिन मोजणी करणारे पथक अथवा महसूल खात्यातील कुठलाच अधिकारी, कर्मचारी दिवसभरात हजर झाला नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतीक्षा करून शेतकर्‍यांनी परतीचा मार्ग धरला. समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांचे हित शासनाने जोपासले आहे. भूसंपादन आणि भूसंचय अशा दोन पद्धती यासाठी अंगिकारण्यात आल्या असून मिळणार्‍या फायद्यांबाबत देखील शेतकर्‍यांचे उद्बोधन करण्यात आले. बहुतांश शेतकर्‍यांना ही संकल्पना पटली. मात्र, मूळ शेतकरी वगळता इतरांमधूनच प्रक्रियेस विरोध होत असून ही बाब विकासाला बाधा पोहचविणारी ठरू शकते. तथापि, जमिन मोजणीबाबत शेतकर्‍यांना गुरूवारी नोटिसा देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मोजणी होणार होती. परंतू ती रद्द करून ही प्रक्रिया आता १४ मार्चला राबविण्यात येणार आहे.- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम