शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस लवकरच होणार प्रारंभ!

By admin | Updated: April 6, 2017 00:47 IST

वाशिम- महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या प्रांतांनी मंजूरी देताच भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमध्ये जमीन मोजणी, दगड रोवणीची कामे आटोपली!सुनील काकडे - वाशिमनागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचे वाशिम जिल्ह्यातील काम जलदगतीने सुरु असून जमीन मोजणी, पिल्लर फिक्सींग पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या प्रांतांनी मंजूरी देताच भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.विकासाचा मार्ग म्हणून गणल्या गेलेला नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे अर्थात समृद्धी महामार्ग निर्मितीच्या प्रक्रियेने सद्या वेग घेतला आहे. या महामार्गासाठी एकंदरित १५०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यानुषंगाने ४ तालुक्यांमधील ५४ गावांमध्ये जमीन मोजणी आणि दगड रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या प्रांतांकडे पाठविला जाणार आहे. भूसंपादनाला भूसंचय पद्धतीचा प्रभावी पर्याय!समृद्धी महामार्गासाठी लागणारी जमीन सरळ भावाने खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. परंतू जे शेतकरी यासाठी तयार नाहीत, त्यांच्याकरिता शासनाने भुसंचय पद्धतदेखील अंमलात आणली आहे. अशा पद्धतीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतीवर्ष मोबदला दिला जाणार असून बागायती जमीनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. याशिवाय १० वर्षापर्यंत प्रतीवर्ष या रकमेत १० टक्के वाढ केली जाणार आहे. याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना कृषी समृद्धी केंद्रात २५ टक्के विकसीत भूखंड दिला जाणार असून त्यास पर्याय म्हणून नजीकच्या जिल्ह्यांमध्येही विकसीत भूखंड देण्याची तरतूद शासनाने केली आहे. शासनाने समृद्धी महामार्ग प्रस्तावित केला असून त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी देखील विविध स्वरूपातील फायदेशीर योजना आखल्या आहेत. त्यामुळे महामार्ग निर्मितीनंतर शेतकरी खऱ्याअर्थाने समृद्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध न करता प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम