शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!

By admin | Updated: June 13, 2016 07:12 IST

मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी

यदु जोशी,

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा विस्तार २० ते २५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारास पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविली आहे. मात्र, या विस्तारात रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत वा रिपाइंपैकी कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे समजते. खोत आणि मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यासही भाजपा श्रेष्ठी अनुकूल नव्हते, पण मुख्यमंत्री आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या नावाला वरून हिरवा झेंडा मिळाला होता. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवर झालेली निवड, धनगर समाजाचे असलेले डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर दिलेली संधी लक्षात घेता, मराठा, धनगर अशा मोठ्या समाजांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लहान मित्रपक्षातील मराठा, धनगर नेत्यांना मंत्रिपदे देण्याबााबत भाजपा नेतृत्व उत्सुक नाही.>नाशिक जिल्ह्याला मिळेल स्थानमंत्रिपदासाठी भाजपामध्येच इच्छुकांची मोठी गर्दी आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख ही नावे पक्की मानली जातात. या शिवाय, नाशिक जिल्ह्याला या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच स्थान दिले जाईल. >महिला कोटाही वाढविला जाऊ शकतो. विस्तारामध्ये शिवसेना सहभागी झाल्यास अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते.पश्चिम विदर्भात मदन येरावार, डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून एक मराठा व एक बिगर मराठा असे स्थान दिले जाऊ शकते. बंजारा समाजाला स्थान द्यायचे ठरले, तर तुषार राठोड राज्यमंत्री होतील.मंत्रिमंडळ विस्तारामध्येही सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न आहे.