ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - महाड पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर-उपनगरातील पुलांचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. गिरणगावातील लालबाग पूलाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागली आहे. शिवाय, काही ठिकाणी पुलाचे सांधे निखळल्याने गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना गणेशभक्तांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.जवळपास पुलाच्या २५ ठिकाणी हे पाइप फुटलेले आहे. पुलाच्या सांध्यांमध्ये मोठमोठ्या फटी पडलेल्या आहेत. काही पुलाचे कठडे खाली कोसळण्याच्या स्थितीत असून या अगोदर कठडा लालबाग मार्केट येथे कोसळला आहे. या ठिकाणी पुलाच्या खालच्या बाजूस दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुलाच्या खांबांना फक्त रंगरंगोटी केली जाते. परंतु बाकीच्या महत्त्वाच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेगेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन सोहळ्यांदरम्यान देखील लालबाग पुलाच्या या दुरवस्थेचा फटका बसला. तसेच, या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घरगुती गणपतीही येथूनच मार्गक्रमण करतात. गणेशोत्सवादरम्यान या लालबाग, परळ, काळाचौकी अशा विभागांत गणेशदर्शनाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. तसेच, बऱ्याच परदेशी नागरिकांचाही यात समावेश असतो. अशा परिस्थितीत अगोदरच रस्त्यांवरील खड्ड्यांचा होणाऱ्या त्रासात भर पडून या पुलाच्या गळतीमुळे गणेशभक्तांची अधिक गैरसोय होईल.... तर पालिकेसमोर छायाचित्रांचे प्रदर्शनदेखभाल व दुरुस्ती पाहणाऱ्या मुंबई महानगर पालिकेला याबाबत वारंवार पत्रव्यवहार करू सुद्धा आजपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हा पावसाळा सुरू झाल्यापासून या पाण्याच्या धबधब्याचा त्रास येथील नागरिक सहन करीत असून काहीवेळा अपघात सुद्धा झालेले आहेत. महानगरपालिकेने याबाबत लवकरात दुरुस्ती नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालबाग पुलावरील फुटलेल्या पाइपांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महानगर पालिकेसमोर करणार आहे. - विजय देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, उपाध्यक्ष .......................................२०११ साली झाले उद्घाटनएकूण खर्च - १४० कोटीलांबी -२.४५ किलोमीटरडॉ.आंबेडकर रोडवरील पाचवा पूलबांधकाम दोन वर्षात पूर्ण- एकूण चार लेन२४५ अभियंते आणि कामगार- ४० महिन्यांपासून राबले रोज ९ तास