शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वतीच्या उपासनेसाठी लक्ष्मीची पावले

By admin | Updated: March 1, 2017 05:30 IST

परीक्षा केंद्रावर जन्मत: दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी संजय शिंदे हिने बारावीचा इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून लिहून पूर्ण केला

यशवंत सादूल,सोलापूर- सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जन्मत: दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी संजय शिंदे हिने बारावीचा इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून लिहून पूर्ण केला. विद्यादेवतेची आराधना करण्यासाठी तिच्या अंगी असलेल्या अंतरिक जिद्दीने सबंध परीक्षागृहातील परीक्षार्थींसह पर्यवेक्षकही थक्क झाले. हैदराबाद रोड, विडी घरकूल येथील गोंधळी वस्तीत १० बाय १२च्या पत्राशेडमध्ये राहणारी लक्ष्मी ही रिक्षाचालकाची मुलगी. जन्मत: दोन्ही हातांनी अपंग असलेल्या लक्ष्मीला शाळेला पाठविणे तसे दुरपास्तच होते. मात्र जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या बालवाडीकडे तिची पावले आपसूकपणे वळली. दिवसभर शाळेबाहेर बसून ती गाणी ऐकायची. बडबडगीते म्हणायची. तिची शाळेबद्दलची आस्था पाहून वडिलांनी शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यासाठी विनंती केली. पण दोन्ही हात नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला. तरीही लक्ष्मी शाळेजवळ जाऊन बसायची. एके दिवशी मुख्याध्यापकांनी पालकाच्या जबाबदारीवर तिला बालवाडीत प्रवेश दिला. लिहिता येत नसले तरी ती अभ्यासात अन्य मुलींसारखी होती. इतरांच्या मदतीने परीक्षा देत ती सातवीपर्यंत पोहोचली. संभाजीराव शिंदे प्रशालेत आठवीत असताना तिने ठरविले, काही झाले तरी आपण स्वत: पेपर लिहायचा. मग ठरले. अथक प्रयत्नांनंतर तिने पायात पेन धरून नववीचा पेपर दिला. मार्च २०१५मध्येही तिने दहावी बोर्डाची परीक्षा स्वत:च्या पायाने लिहून दिली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत जायची तिची इच्छा आहे.>जन्मत: दिव्यांग असलेल्या लक्ष्मीचं पुढचं भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाचे कौतुक सर्वप्रथम ‘लोकमत’ने केल्यानंतर अनेक संस्थांनी मदतीचा हात दिला.