तळोजा : खोटे दस्तावेज बनवून त्याच्या सहाय्याने तीन नामांकित बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना तळोजा परिसरात घडलेली आहे.तळोजा पाचनंद मुनलाइट बिल्डिंगमधील सदनिकांचे एनओसी, सिडको एनओसी, तसेच कर्जासाठी लागणारे इतर बनावट कागदपत्रांच्या साह्याने नवी मुंबई को-आॅप. बँक यांच्याकडून २५ लाख, पंजाब नॅशनल बँक कांदिवली यांच्याकडून २८ लाख तर बँक आॅफ इंडिया मुंबई यांच्याकडून ३० लाख रु पये कर्ज घेत एकूण ८३ लाखांचा गंडा या बँकांना घालण्यात आला आहे. या तीन नामांकित बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेत चक्क बँकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन बँकांना लाखोंचा गंडा
By admin | Updated: April 29, 2016 03:38 IST