शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये विसरल्या सव्वा लाखाच्या लेन्स

By admin | Updated: September 29, 2016 03:59 IST

मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू विसरतात आणि ती वस्तू शोधण्याचे कर्तव्य लोहमार्ग पोलिसांना पार पाडावे लागते. अशाच एका घटनेत

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू विसरतात आणि ती वस्तू शोधण्याचे कर्तव्य लोहमार्ग पोलिसांना पार पाडावे लागते. अशाच एका घटनेत एक प्रवासी सव्वा लाख किमतीचे डोळ्याचे लेन्स असलेली बॅग विसरले. त्यानंतर या बॅगेचा शोध घेत लोहमार्ग पोलिसांनी ती बॅग पुन्हा प्रवाशाला परत मिळवून दिली. मंगळवारी सायंकाळी ४.१0 वाजता धनराज जाधव या प्रवाशाने विलेपार्ले स्थानकातून दादरला जाण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली. त्या वेळी सोबत डोळ्याच्या लेन्सची असलेली २५ पाकिटांची बॅग डब्यातील रॅकवर ठेवली. दादर स्थानकात उतरल्यानंतर बॅग लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आले. त्वरित त्यांनी मागूनच आलेली चर्चगेट लोकल पकडली आणि चर्चगेट स्थानक गाठले. तेथे उभ्या असणाऱ्या लोकलमध्ये बॅग शोधूनही ती न सापडल्याने अखेर जाधव यांनी लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि सर्व माहिती दिली. त्यानंतर हेल्पलाइनमधून वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चर्चगेट-अंधेरी लोकल वांद्रे स्थानकात येताच बॅगेची शोधाशोध सुरू केली असता ती बॅग याच लोकलमध्ये सापडली. बॅगेत असणाऱ्या साहित्याची खातरजमा केल्यानंतर ती जाधव यांना सुपुर्द केली. (प्रतिनिधी)