शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

लाखो भाविकांचे कुंभस्नान !

By admin | Updated: August 30, 2015 02:56 IST

छत्र, चामरे आणि निशाण नाचवित शाही मिरवणुकीने मार्गक्रमण करीत ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात गोदामाईच्या भेटीची आस लागलेल्या जटाधारी साधू-महंतांनी ब्रह्ममुहूर्तावर

नाशिक : छत्र, चामरे आणि निशाण नाचवित शाही मिरवणुकीने मार्गक्रमण करीत ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात गोदामाईच्या भेटीची आस लागलेल्या जटाधारी साधू-महंतांनी ब्रह्ममुहूर्तावर नाशिकक्षेत्री रामकुंड, तर त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थाकडे वायू वेगाने झेपावत अन् सिंहस्थ कुंभपर्वातील पहिल्या पर्वणीत गोदेच्या प्रवाहात सदेह झोकून देत शाहीस्नान केले.नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत गोदामाईच्या साक्षीने ‘धर्मरक्षा’बंधनाचा हा सोहळा रंगला. शैव-वैष्णवांच्या मुख्य शाहीस्नानानंतर दिवसभरात लाखो भाविकांनी गोदावरीत स्नान केले. पहाटे तपोवनातील साधुग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीत वैष्णव संप्रदायातील निर्वाणी, दिगंबर व निर्मोही आखाड्यासह त्यांचे खालसे सजविलेल्या वाहनांतून निघाले होते. आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज, श्री महंत धर्मदास महाराज, महामंत्री गौरीशंकरदास, उपमहंत जगन्नाथदास, राधेश्याम महाराज यांच्यासह त्यांचे सात आखाडे आणि खालशांच्या महंतांनी गोदावरी पूजन करीत स्नानाचा संकल्प सोडला. सकाळी १०.३० वाजेनंतर भाविकांना रामकुंड व गांधी तलाव परिसर स्नानासाठी खुला करून देण्यात आला.त्र्यंबकेश्वरी शैवांचे स्नान... रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोलताशांच्या गजरात धर्मध्वजा डौलाने मिरविण्यात आल्या. दहाही आखाड्यांच्या हजारो साधू-महंतांचे पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान त्र्यंबकेश्वरी सहा तासांनंतर पार पडले. श्री महंतांवर महापौर अशोक मुर्तडक पुष्पवृष्टी करीत होते. रामकुंडावरील अमृतकुंभाजवळ जलसंपदामंत्री गिरीश महाजन श्री महंतांचे पुष्पहार घालून स्वागत करीत होते. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी सोहळ््याला उपस्थित होते.