शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेमुळे विदेशात गेलेली ‘लेक’ परतीच्या मार्गावर

By admin | Updated: February 12, 2017 23:08 IST

लेक वाचवा, लेक शिकवा या ब्रीद वाक्याखाली राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या रूची चव्हाण

नंदुरबार : लेक वाचवा, लेक शिकवा या ब्रीद वाक्याखाली राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या रूची चव्हाण हिच्या शिक्षणात गावातील युनियन बँक अडथळा ठरत आहे़ गेल्या पाच महिन्यांपासून तिच्या पालकांना बँक कर्ज देत नसल्याने तिचे शिक्षण धोक्यात आले आहे़ रनाळे येथील जितेंद्र चंदुलाल चव्हाण (तांबोळी) यांची मुलगी रूची चव्हाण बारावीच्या वर्गातून गेल्यावर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर १६ सप्टेंबर २०१६ रोजी रशियातील पेंझा युनिवर्सिटी येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रवाना झाली़ रवाना होण्यापूर्वी रनाळे पंचक्रोशीतून तिचा गौरव करण्यात आला होता़ या भागातून प्रथमच एक कन्या परदेशात शिक्षणासाठी जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत तिचे कौतूक केले होते़ तिच्या पालकांनी तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावातीलच युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता़ रूची ही परदेशात रवाना होण्यापूर्वी बँकेने तिला शैक्षणिक कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती़ मात्र रूची परदेशात रवाना झाल्यानंतर बँकेने तिचे आजोबा आणि वडील या दोघांसमोर जाचक आणि पूर्ण न होणाऱ्या अटी समोर ठेवत कर्ज देण्याची तयारी दर्शवल्यानंतर समस्यांना सुरूवात झाली आहे़ सप्टेंबर महिन्यापासून बँकेत चकरा मारणाऱ्या रूचीच्या आजोबांना जानेवारी महिन्यात रक्तदाबाचा विकार उद्भवला होता़ येत्या मार्च महिन्यात या बँकेकडून कर्ज न मिळाल्यास वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावरच बंद करून संबधित विद्यापीठ रूची हिला घरी पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ बँकेने कर्ज द्यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून तिचे वडील जितेंद्र चव्हाण व तिची आई ज्योती यांनी प्रशासन आणि बँक यांनी उंबरठे झिजवत ‘लेक वाचवा लेक शिकवा’ची जिद्द कायम ठेवली आहे़