शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साता-याच्या लाडू-चिवडा महोत्सवासाठी तब्बल टनाने लाडू

By admin | Updated: October 24, 2016 21:47 IST

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, त्यामुळे ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाची व्हावी, या हेतूने साता-यात अनेक वर्षांपासून लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो.

आॅनलाईन लोकमत 
सातारा, दि. 24 -  दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, त्यामुळे ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाची व्हावी, या हेतूने साता-यात अनेक वर्षांपासून लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो. यासाठी शेकडो टन लाडू बनविले जात आहेत. कमी दरात लाडू-चिवडा मिळणार असल्याने गरिबांची दिवाळी गोड होणार हे नक्की. सातारा येथील व्यापारी असोसिएशनतर्फे  पोलिस मुख्यालयासमोर लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो. या ठिकाणी कमी दरात लाडू-चिवडा उपलब्ध होत असल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतून त्याला मोठी मागणी असते.  शाळा-महाविद्यालयांना अद्याप सुटी लागलेली नाही. अनेक नोकरदारांचा बोनस झालेला नाही. या परिस्थितीत डाळी घरी आणून त्या वाळवून, दळून आणायला आणि लाडू बनवायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे तयार लाडू नेण्यासाठी गृहिणी मोठी पसंती देत असतात. (प्रतिनिधी)  आठ दिवसांपासून चार हजार किलो लाडू या ठिकाणी आतापर्यंत सुमारे तीन ते चार हजार किलो लाडू बनविले आहेत. यासाठी पंधरा ते वीस कामगार आठ दिवसांपासून रात्रंदिवस काम करत आहेत. हे लाडू अवघे १२० रुपये किलो दराने विकले जाणार आहेत.  कोट : फराळ तयार करणारी आमची ही चौथी पिढी आहे. कृष्णा राऊत यांनी सर्वप्रथम दिवाळीचे फराळ तयार केले. त्यावेळी चिवडा, चकली व लाडूंना मागणी होती. आता विविध दहा पदार्थ तयार केले जात आहेत.  - भरत राऊत, मिठाई दुकानदार  फोटो आहे... २४सातारा-लाडू दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या सणात घरोघरी करंजी, लाडू, चिवडा, अनारसे असे गोडधोड पदार्थ बनविले जातात. मात्र, अनेक नोकरदार गृहिणींना हे पदार्थ घरी बनविणे शक्य होत नाही. साताºयातील बाजारपेठेत दिवाळीची गोडी वाढविणाºया लाडवांना प्रचंड मागणी असून, व्यापारी असोसिएशनच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडू बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. (छाया : जावेद खान)