शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

By admin | Updated: May 17, 2016 04:06 IST

पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला.

कर्जत : यंदा लातूरमध्ये भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वर्षांपूर्वी कर्जतकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पंधरा वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने कर्जतमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविला आणि त्यावेळी कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेचा पाठपुरावा करून दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळवून दिले. त्यावेळी हा उपक्रम राबविला नसता तर कर्जतकरांवरही लातूरसारखी परिस्थिती ओढवली असती. कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म पुन्हा राबवावा, अशी मागणी होत आहे.१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कर्जतची पेज नदीवरील पाणी योजना शंभर टक्के अनुदानाने मंजूर केली. त्यासाठी १४ कोटी १३ लाख रु पये निधी मंजूर करून योजनेचे काम सुरु करण्यात आले. यासाठी तत्कालीन मंत्री रवींद्र माने, आमदार देवेंद्र साटम, नगराध्यक्ष धनंजय चाचड, नगरसेवक प्रवीण गांगल आणि त्यांच्या टीमने प्रयत्न केले होते. योजनेचे सात टक्के काम झाले असताना १९९९ मध्ये सरकार बदलले आणि त्या आघाडी सरकारच्या धोरणा मुळे पाणी योजना ठप्प झाली. दीड दोन वर्षे झाली तरी योजनेचे काम पुढे जात नव्हते. २१ सप्टेंबर २००१ रोजी ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्र म कर्जतमध्ये आयोजित करण्याचे ठरले. कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. सध्या कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. त्यातील अडथळे दूर करून तो मार्गी लागल्यास कर्जतकरिता दुसरी पाणी योजना तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आंदोलने सुद्धा झाली परंतु काहीही उपयोग नाही. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म आणावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)