शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्राचा अभाव!

By admin | Updated: June 21, 2016 23:41 IST

कृषी हवामानशास्त्रावर एकाच कृषी विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रम.

राजरत्न सिरसाट/अकोलाशेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीसाठी अचूक माहिती देण्यासाठी कृषी हवामानशास्त्राचा मोठा हातभार लागतो; परंतु राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्रच उपलब्ध नसून, या विषयावरील संशोधनासाठी एकाच कृषी विद्यापीठात कृषी हवामानशास्त्रावर आचार्य पदवी असल्याने या विषयातील तज्ज्ञच तयार होत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, अकोल्यात या विषयावर एम.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता प्रथम केरळ व पंजाब कृषी विद्यापीठाने आघाडी घेतली. विशेष म्हणजे, या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला; परंतु हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.राज्यातील शेतीसमोर हवामानबदलाचे मोठे आव्हान आहे. या बदलांमुळे पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसांत जास्त पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होतो. तापमानात बदल होत आहे. या सर्वांचा परिणाम पिके व उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञांपुढे नियोजन करताना मोठय़ा अडचणी निर्माण होत आहेत. यासाठीच स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र असावे, ही मागणी कृषी विद्यापीठांनी लावून धरली आहे.- कृषी हवामानावर पीएच.डी. प्रगत महाराष्ट्रात एकाही कृषी विद्यापीठाकडे स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र नाही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोडले, तर इतर तीन विद्यापीठांमध्ये या विषयावर पीएच.डी. करता येत नाही आणि तेथेही पीएच.डी.ला दोन ते तीन विद्यार्थ्यांचीच प्रवेशक्षमता आहे.