शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बँकांची मंत्र्यांवर ‘कृपा’!, बँकांना ५३.२५ कोटी रुपयांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 04:50 IST

कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर असलेल्या ७८.७५ कोटी रुपयांच्या कर्जाचे २५.५० कोटी रुपयांत ‘सेटलमेन्ट’ करण्यात आले

मुंबई : कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर असलेल्या ७८.७५ कोटी रुपयांच्या कर्जाचे २५.५० कोटी रुपयांत ‘सेटलमेन्ट’ करण्यात आले असून या कर्जाचे पुनर्गठन करताना बँकाना ५३.२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीने मद्यार्क तयार करण्यासाठी महाराष्टÑ बँक व युनियन बँकेकडून प्रत्येकी २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. संभाजी पाटील निलंगेकर हे या कर्जाचे जामीनदार आहेत. कंपनीने दोन वर्षे कर्जाचा नियमित भरणा केला. पण २०११ पासून मुद्दल व व्याज दोन्हीचे पैसे थकित होते. ३० जुलै २०११ ला ही दोन्ही कर्जे एनपीए झाली. त्यापोटी कंपनीने एकूण ७८.७५ कोटी रुपये (मुद्दल व व्याज पकडून) भरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही बँकांनी कृपा दाखवत अवघ्या २५.५० कोटी रुपयांत प्रकरण ‘सेटल’ केले.प्राप्त माहितीनुसार, महाराष्टÑ बँकेचे व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीकडून एकूण २०.०९ कोटी रुपये मुद्दल व त्यावरील व्याज २१.७५ कोटी, असे एकूण ४१.८४ कोटी रुपये येणे होते. पण बँकेने हे खाते ‘सेटल’ करताना पूर्ण व्याज व मुद्दलाच्या काही रक्कमेचीही माफी दिली.  यामुळे कंपनीला आता फक्त १२.७५ कोटी रुपयांचीच परतफेड करायची आहे. याचप्रमाणे युनियन बँकेचे मुद्दल २०.५१ कोटी व त्यावरील १६.४० कोटी रुपये व्याज पकडून ३६.९१ कोटी रुपयांचा भरणा कंपनीने करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र बँकेने हे प्रकरण फक्त १२.७५ कोटी रुपयांत ‘सेटल’ केले.अन्य प्रकरण सीबीआयकडेसंभाजी पाटील निलंगेकर यांनी आजोबांची जमीन त्यांना माहिती न देता बँकेकडे गहाण ठेवली होती. ते प्रकरण उघड झाल्यावर बँकेने सीबीआयकडे तक्रार केली होती. सीबीआयने संभाजी पाटील व कंपनीची चौकशी करुन ३०२७ पानांचे आरोपपत्र लातूरच्या न्यायालयात दाखल केले. त्यावर अद्याप सुनावणी बाकी आहे.सारे काही नियमानुसारच‘कर्जाचे पुनर्गठन नियमानुसारच झाले आहे. व्यावसायिक कर्जात अशाप्रकारे बँका पुनर्गठन करतात. ही सर्व प्रक्रिया रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या अधीन राहून करण्यात आली आहे. यामध्ये मी केवळ जामीनदार आहे. या कंपनीशी किंवा कर्जाशी थेट संबंध नाही.- संभाजीराव पाटील, कामगार मंत्री