शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बहुरूपी लोककला काळाच्या ओघात लोप

By admin | Updated: November 19, 2016 03:12 IST

महाराष्ट्रात बहुरूपी कला श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती.

गिरीश गोरेगावकर,

माणगाव- महाराष्ट्रात बहुरूपी कला श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती. मात्र सध्या काळाच्या ओघात ही बहुरूपी कला लोप पावत आहे. माणगाव येथे बहुरूपी कलाकार अर्जुन सुदाम शेगर (रा.येळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर) हे पोलीस वेशात बाजारपेठेच्या प्रत्येक दुकानात जाऊन पोलिसी खाक्या दाखवत फिरत होते. खरच की काय पोलीस आले आपल्या दुकानात चौकशीला आले असे दुकानदाराला वाटत होते. त्यामुळे काही काळ नागरिकांसह दुकानदार देखील हैराण झाले. परंतु आजच्या या धावपळीच्या जगात अर्जुन सुदाम शेगर यांनी ही कला जिवंत ठेवल्याने साऱ्यांनी त्यांचे कौतुक के ले.महाराष्ट्रात बहुरूपी लोककला जागरूकता शिवाजी महाराजांपासून खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. सद्यपरिस्थितीत ही कला लोप पावत असलेली दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी हेरिगिरीचे काम चोख बजावत असत. म्हणून त्यांना खबरी म्हणत. नंतरच्या काळात पोलिसांना मदत म्हणून सीआईडीचे काम सुद्धा बहुरूपी कलाकारांनी केल्याचे दिसले आहे. बहुरूपी कलाकार गावागावात जाऊन राम, लक्ष्मण, हनुमंत, पोलीस,वकील आशा विविध रु पांचे सोंग घेऊन फिरत असत. असे कार्यक्र म एका गावात आठ आठ दिवस राहून करीत असत. गावातील चोरी, भानगडी आदी गावातील माहिती ही बहुरूपी पोलिसांना देत असत. पोलिसांना याची नेहमी गुन्ह्यामध्ये मदत होई.सद्यपरिस्थितीत बहुरूपी कलाकारांना सध्याची पिढी ओळखत सुद्धा नाही. तरीपण ही परंपरा जिवंत ठेवण्याचे काम अर्जुन सुदाम शेगर हे करीत आहेत. काही लोक बहुरूपी कलेला नावं ठेवतात. >मागणी : हे कलाकार वर्षातून दोन महिने बहुरूपीचे काम करतात. नंतर उर्वरित महिने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असतात. आमच्या कलेची दाद देऊन काही प्रमाणात मानधन देण्यात यावे, अशी या कलाकारांची मागणी आहे