शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

मराठी साहित्यविश्वात उत्कटतेची उणीव

By admin | Updated: May 27, 2015 01:08 IST

मराठी साहित्याला काही वर्षांपासून ‘उत्सवी’ स्वरूप आले आहे. उत्सव म्हटला की यात उत्कटतेपेक्षा उन्मादाला जास्त वाव राहतो. या उत्सवी स्वरूपामुळेच ‘अच्छे दिन’ आले असल्याचा केवळ आभास निर्माण होतो.

पुणे : मराठी साहित्याला काही वर्षांपासून ‘उत्सवी’ स्वरूप आले आहे. उत्सव म्हटला की यात उत्कटतेपेक्षा उन्मादाला जास्त वाव राहतो. या उत्सवी स्वरूपामुळेच ‘अच्छे दिन’ आले असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. आज खऱ्या अर्थाने मराठी साहित्यविश्वात ‘उत्कटतेची’ उणीव भासत असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०९व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी आयोजित वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर होते. मंगला गोडबोले यांनी लेखिका या नात्याने स्वानुभवाची शिदोरी रिती करीत लेखकांना लेखनामागच्या प्रपंचाविषयीचे तत्त्वज्ञान सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘साहित्य ही जीवनाची वास्तविक गरज नसते तर ते जीवनाचे ‘बाय’प्रॉडक्ट असते. आपण लिहिण्यासाठी जगत नाही तर समरसून जगण्यासाठी लिहिले तर त्यातील आनंद मिळतो. साहित्यात उत्कटतेची उणीव भासू लागली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छापून येणे खूप सोपे झाले आहे, पण वाचकाच्या मनावर खोलवर छापले जाईल असे लेखन होत आहे का, याचा विचार व्हायला पाहिजे. सुचण्याचा क्षण हा लेखकासाठी श्रीमंतीचा क्षण असतो, तो कुठेही मोजता येत नाही.’’ सुचणं आणि पोहोचणं यासाठी लेखकाने लिहीत राहिलं पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सत्काराला उत्तर देताना अमृता सुभाष हिने पहिल्याच लेखनाला मानाचा पुरस्कार मिळणे हा आनंदाचा क्षण आहे. आत्मशोध घेण्यासाठी अशा शाबासकीच्या थापेची गरज असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा सुर्वे यांनी केले, तर आभार सुनील महाजन यांनी मानले. (प्रतिनिधी)पारितोषिकाचे मानकरीग्रंथ पारितोषिक- ल. सि. जाधव, प्रभाकर बागले, डॉ. शिवाजीराव मोहिते, विशाखा पाटील, सुधीर फडके, आ. श्री. केतकर, प्रा. रायभान दवंगे, आनंद अंतरकर, धोंडूजा इंगोले, प्रा. खासेराव शितोळे, डॉ. विजया फडणीस, मुग्धा देशपांडे, श्रीधर नांदेकर, रामकृष्ण अघोर, नयन राजे, लक्ष्मीकांत देशमुख, कलापिनी कोमकली, डॉ. रेखा इनामदार, सहदेव चव्हाण, डॉ. उपेन्द्र किंजवडेकर, राजीव साने, अमृता सुभाष, प्रभा गणोरकर, डॉ. अरुणा ढेरे. ग्रंथकार पुरस्कार - अभय टिळक, शैला दातार, संगीता जोशी, अशोक बागवे, डॉ. संजय ढोले, प्रा. चंद्रकांत पाटील, इरावती कर्णिक, डॉ. संगीता बर्वे, डॉ. विजया वाड, भानू काळे.