शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तोट्याचे रडगाणे गाता येणार नाही

By admin | Updated: October 2, 2016 01:34 IST

सुरुवातीचे आठ वर्षे नुकसान सोसून त्यानंतर नफा कमवण्याची योजना आखूनच मेट्रो सुरू करण्यात आली. तशी अटच करारात नमूद केली आहे. त्यामुळे तोट्याचे रडगाणे गात

मुंबई : सुरुवातीचे आठ वर्षे नुकसान सोसून त्यानंतर नफा कमवण्याची योजना आखूनच मेट्रो सुरू करण्यात आली. तशी अटच करारात नमूद केली आहे. त्यामुळे तोट्याचे रडगाणे गात एमएओपीएल (मुंबई मेट्रो वन प्रा. लि.) भाडेवाढीसाठी केलेला अर्ज चुकीचा असल्याचा दावा शनिवारी एमएमएआरडीएने उच्च न्यायालयात केला.मेट्रो कायद्यांतर्गत दर निश्चित समितीने (एफएफसी) केलेली भाडेवाढ लागू करण्याची परवानगी घेण्यासाठी एमएमओपीएलने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे एफएफसीच्या बेसुमार भाडेवाढीला एमएमआरडीएने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील अंतिम सुनावणीला शनिवारपासून सुरुवात झाली. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवरील सुनावणी होती.मेट्रो तोट्यात असून, आॅपरेटिंगचा खर्चही निघत नाही. तसेच एफएफसीने भाडे निश्चिती केल्याने एमएमआरडी करारानुसार भाडे आकारण्याची सक्ती करू शकत नाही, असे एमएमओपीएलने याचिकेत म्हटले आहे. मात्र एमएमओपीएलच्या या मुद्द्यांवर एमएमआरडीएने आक्षेप घेतला. ‘एफएफसीने दर निश्चित करताना करारातील अट लक्षात घेतली नाही. साध्या बेस्ट बसेसच्या केवळ दीडपट जास्त भाडे आकारण्याची अट करारात घालण्यात आली आहे. मेट्रो कायद्यामुळे करार रद्दबातल होत नाही. हे एमएमओपीएलने लक्षात घ्यायला हवे होते. मेट्रो नफा कमावण्यासाठी नसून सार्वजनिक वाहतुकीवर पर्यायाने रस्त्यांवर आलेला भार कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. भाडे वाढवून नफा कमवण्याऐवजी प्रवासी वाढवून नफा कमवण्याचा उद्देश मेट्रोचा आहे. मेट्रोने २०१२नंतर प्रवासी १० रुपयांवरून १४ रुपये वाढवले. याचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर झाला. दरवर्षी एक लाख प्रवासी कमी होत आहेत. केवळ एसीमधून प्रवास करणाऱ्या ‘हायक्लास’साठी मेट्रो नाही. दीड लाख लोकांसाठी सर्वसामान्य नागरिकांनी त्याग केलेला नाही. मेट्रो उभारण्यासाठी काही वर्षे लागली. ज्या ठिकाणाहून मार्ग काढण्यात आले तेथील सामान्य नागरिकांनी त्रास सहन केला. एमएओपीएल व रिलायन्स ही गोष्ट विसरत आहे,’ असे अ‍ॅड. चिनॉय यांनी सांगितले. ‘उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ३ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) अटी मान्य कराव्या लागतील...मेट्रो तोट्यात राहील म्हणून सरकारने कंपनीला डी.एन. नगर स्टेशनजवळील यार्डाची २७ एकर जागा दिली तसेच अन्य सुविधा दिल्या. मेट्रोसाठी भूखंड संपादित करावे लागले, त्यासाठी सरकारने संबंधितांना नुकसानभरपाई दिली. त्यामुळे एमएमओपीएला करारातील अटी मान्य कराव्या लागतील, असे अ‍ॅड. चिनॉय यांनी म्हटले.