शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, संततधारमुळे लोकल सेवा मंदावली

By admin | Updated: June 28, 2017 09:32 IST

मुंबईसह राज्यात बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.28 - मुंबईसह राज्यात बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे.  येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलची वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे. यामुळे ऐन गर्दी व कार्यालय गाठण्याच्या वेळेस चाकरमान्यांचे हाल होत आहेत.  तर आज दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी मोठी भरती येणार आहे. 
 
‘मुसळधार’चा इशारा
बुधवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारी कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने वर्तविले आहे.
मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीला गती येण्यासाठी व पिकाची उगवण होण्यासाठी चांगला पाऊस अपेक्षित आहे.
राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून मंगळवारी मुंबई, ठाणे व नागपूरमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पश्चिम वऱ्हाडातही पावसाचे दमदार आगमन झाले. मुंबईत पावसामुळे सकाळी लोकलचा वेग मंदावला. नागपूरच्या काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. अकोला, वाशिम जिल्ह्यांतही वरुण बरसला. ठाणे जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून कोसळणारा पाऊस मंगळवारी दिवसभर सुरूच होता.
 
नाशिक जिल्ह्यात ईगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडल्याने मुंबईहून नाशिक आणि नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लांब पल्ल्यांच्या गाड्याही उशिराने धावत होत्या.