शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

पालकत्व लाभूनही बुद्धघोष एकाकी!

By admin | Updated: July 6, 2015 02:22 IST

तिरोडा येथील भूकबळी प्रकरणातील अभागी महिलेच्या गतिमंद मुलाला गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोंदिया : तिरोडा येथील भूकबळी प्रकरणातील अभागी महिलेच्या गतिमंद मुलाला गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सध्या त्याच्याजवळ कोणीच नसल्याने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी गोंदिया शहर पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन त्या मुलाला (बुद्धघोष) नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात घेऊन जाण्यास सूचविले आहे. सध्या आहे त्या अवस्थेत त्याला काही झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणात ललिता रंगारी यांचा मृत्यू झाल्यानंतर तिची दोन्ही मुले अनाथ झाली. या प्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दोन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारले़ त्यानंतर चार दिवसांपूर्वी गतिमंद बुद्धघोषला गोंदियात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्याच्या मामाचीही प्रकृती ठीक नसल्यामुळे सध्या त्याच्याजवळ कोणीच नातेवाईक नाही. अशा परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.केटीएस रुग्णालयात दाखल केलेल्या गतिमंद बुद्धघोषसाठी चार कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. मात्र, प्रत्यक्षात ते कर्मचारी त्याची देखभाल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोलिसांना पत्र देऊन त्याला नागपूरला हलविण्याचे सूचित केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे यावरून स्पष्ट होते.बुद्धघोषला गतिमंदांच्या शाळेत पाठविले जाईल. सध्या त्याच्या देखभालीसाठी चार कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम केले जात आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.- डॉ. रवी धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया