शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार क्षमतेचा देशात अभाव - अदी गोदरेज

By admin | Updated: January 10, 2016 01:11 IST

देशात अथवा राज्यात बेरोजगारीच्या समस्येपेक्षा तांत्रिक कौशल्याचा मोठा प्रश्न आहे. ही रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गोदरेज उद्योग समूह प्रयत्न करत आहे, शिवाय मुंबईतल्या तिवरांच्या

मुंबई : देशात अथवा राज्यात बेरोजगारीच्या समस्येपेक्षा तांत्रिक कौशल्याचा मोठा प्रश्न आहे. ही रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गोदरेज उद्योग समूह प्रयत्न करत आहे, शिवाय मुंबईतल्या तिवरांच्या संवर्धनासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती गोदरेजचे अध्यक्ष अदी गोदरेज यांनी दिली.ते राज्यपालांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजभवनातील दरबार हॉल देशातल्या श्रीचंद हिंदुजा, एस. रामादुराई यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजकांनी गच्च भरला होता. सगळ्यांनीच आपली कंपनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून काय करत आहे याची माहिती दिली. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, आम्ही आजपर्यंत यामाध्यमातून ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून १५ लाख लोकांना विविध प्र्रकारची मदत झाली आहे. राज्यात आमची भागीदारी आम्ही आणखी व्यापक करू, असेही त्यांनी सांगितले. बिर्ला फाऊंडेशनच्या राजश्री बिर्ला म्हणाल्या, सीएसआरच्या माध्यमातून काम करण्याचा कायदा तर आत्ता झाला आहे, मात्र सामाजिक दायित्व जोपासण्याचे काम बिर्ला उद्योग समूह वर्षानुवर्षे करत आला आहे. तर रत्नागिरी, कर्जत, नागपूर आदी भागात केलेल्या कामांची माहिती पिरामल उद्योग समूहाच्या उर्वी पिरामल यांनी दिली. (प्रतिनिधी)