शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून शौचालय बांधण्यास पुढाकार घेणार- सदाभाऊ खोत

By admin | Updated: April 17, 2017 22:38 IST

गावे स्वच्छ आणि हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.17 - गावे स्वच्छ आणि हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: शौचालय निर्मितीसाठी श्रमदान करण्यास सुरुवात केली असून, सोलापूर जिल्ह्यापासून त्याची सुरुवात झाली आहे. राज्यातील निवडक भागात खोत हे स्वत: श्रमदानात सहभागी होणार आहेत. स्वच्छ गावांच्या निर्मितीसाठी शौचालय आणि शोषखड्डे बांधकामासाठी लोकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन खोत यांनी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत 106 तालुके आणि 14 हजार 470 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. गेल्या वर्षी 19 लाख 40 हजार 996 शौचालये बांधण्यात आली आहेत. यावर्षी 25 लाख शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, वर्धा, सांगली आणि ठाणे या 7 जिल्ह्यांमध्ये कुटुंब तेथे शौचालय बांधण्यात आले आहे.खोत यांनी 15 एप्रिलला वाशीम जिल्ह्यात शेलू बाजार, पेडगाव आणि 16 एप्रिलला बुलडाणा जिल्ह्यातील हातणी येथे स्वत: श्रमदान करून सकारात्मक संदेश राज्यातील जनतेला दिला आहे. शौचालय बांधणीच्या कामात उत्तम काम करणा-या ग्रामपंचायती व समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.नूतन बनली स्वच्छतेची ब्रँड ॲम्बॅसिडरमोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील नूतन विष्णू धोरण या मुलीने आईकडे हट्ट करून शौचालय बांधण्याचे काम करून घेतले. त्यासाठी नूतनच्या आईने मंगळसूत्र विकले. हगणदारीमुक्तीच्या कार्याला प्रेरक असलेल्या नूतनचा यावेळी तिच्या आईवडिलांसह सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, नूतनला जिल्ह्याची स्वच्छता ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आले. नांदुरा तालुक्यातील खैरा येथील प्रमोद मनोहर वाघ या सलून व्यावसायिकाने शौचालय बांधलेल्या पुरूषांची दाढी, कटिंग वर्षभर विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.