शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुशाभाऊ बांगर शाळेची घंटा वाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 01:53 IST

चांदिवली येथील संघर्षनगरमधील कुशाभाऊ बांगर शाळेवर होत असलेल्या तोडक कारवाईविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या चिमुकल्यांच्या संघर्षाला यश आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार

मुंबई : चांदिवली येथील संघर्षनगरमधील कुशाभाऊ बांगर शाळेवर होत असलेल्या तोडक कारवाईविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या चिमुकल्यांच्या संघर्षाला यश आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेचे वर्ग पर्यायी जागेत भरविणे सुरु झाले आहे. शुक्रवारपासून पर्यायी जागेत शाळेचे वर्ग भरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला असून, शाळेने समाधान व्यक्त केले आहे.बांगर या अनुदानित शाळेवर विकासकाच्या संगनमतामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधातच आवाज उचलला आणि लढा दिला. तब्बल दोन वेळा शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झालेल्या पालिकेला विद्यार्थ्यांसमोर माघार घ्यावी लागली. अखेर उच्च न्यायालयात यावर झालेल्या सुनावणीदरम्यान ३० एप्रिल २०१६ पर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण व्हावे यासाठी त्याच परिसरात पर्यायी सात वर्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने विकासकाला दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांना पर्यायी जागी उपलब्ध करून देण्यात आली.पुढे काय? : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याचे समाधान आहे. मात्र मराठी शाळांचा मुद्दा ऐरणीवर आहे. शाळा शंभर टक्के अनुदानित असताना पालिकेकडून शाळेसाठी कायमस्वरुपी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे कालांतराने जागेअभावी शाळा बंद पडणार का? हा सवाल असून, याबाबत पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरु आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांनी दिली.