शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कुसेगाव सीसीटीव्ही बसविणारे तालुक्यातील पहिले गाव

By admin | Updated: July 13, 2017 01:17 IST

कुसेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात विविध उपक्रम राबविले जात

लोकमत न्यूज नेटवर्कवासुंदे : कुसेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात विविध उपक्रम राबविले जात असून नुकत्याच एका वेगळ््या उपक्रमाची म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेची सुरुवात गावाने सुरु केल्याने कुसेगाव हे दौंड तालुक्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे पहिले गाव ठरले आहे.गावामध्ये बसविण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रणेचे उदघाटन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मनोज फडतरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, तालुका कृषी अधिकारी अनिल बोरावके, सत्वशील शितोळे, प्रशांत शितोळे, रमेश भोसले, काका खळदकर, डॉ.रामदास आव्हाड, डॉ.कांबळे, नवनीत जाधव, विजय शितोळे, श्रीकांत शितोळे, गणेश मोरे, मनिष शितोळे, अनिल शितोळे, प्राचार्य विनायक सुंबे, ग्रामसेवक दिपक बोरावके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच मनोज फडतरे यांनी सांगितले की, कुसेगावसारख्या जिरायत पट्ट्यातील गावाने शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेऊन गावच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाडे गावात लावली आहेत. तसेच निर्मल ग्राम योजना, हागणदारीमुक्त गाव योजना, तंटामुक्ती अभियान, जलयुक्त शिवार अभियान अशा विविध योजनांमधून उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. निश्चितच हे सर्व करण्यासाठी गावातील सर्व संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात दौंड तालुक्यातील कुसेगावची ओळख ही स्मार्ट व्हिलेज म्हणून होईल असा दृढ विश्वास सरपंच मनोज फडतरे यांनी व्यक्त केला.या वेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले की, कुसेगाव सारख्या ग्रामीण भागातील एका छोट्या गावाने सीसीटीव्ही सारखी यंत्रणा सुरु केल्याने गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना निश्चितच मदत होईल. तसेच पोलीसांचे कामही काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे आगामी काळात कुसेगावचा आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे.