शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात भाजपाची सेनेवर कुरघोडी

By admin | Updated: February 25, 2017 01:07 IST

जिल्हा परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणाचा बाज बदलून टाकला असून, पुढच्या पाच-पंचवीस वर्षांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे स्पष्ट संकेत दिले.

सुधीर महाजन, औरंगाबादजिल्हा परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणाचा बाज बदलून टाकला असून, पुढच्या पाच-पंचवीस वर्षांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे स्पष्ट संकेत दिले. लातुरात भाजप स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता राबविणार. येथील काँग्रेसची परंपरागत जहागीरच खालसा झाली. हे उदाहरण राजकारणाची दिशा देण्यासाठी पुरेसे आहे. परंपरागत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछाडीवर गेले; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईनंतर उर्वरित महाराष्ट्रात पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठवाडा काबीज केला होता आणि मराठवाड्याच्या मातीत ती फोफावली, त्याचे कारण तिचा हिंदुत्वाचा बाज आणि पोलीस अ‍ॅक्शननंतर मराठवाड्याची बनलेली मानसिकता; पण या निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा विचार करता हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. एकीकडे मुस्लिम इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) हा पक्ष अस्तित्व दाखवत असताना शिवसेनेची पीछेहाट या पक्षाला विचार करायला लावणारी आहे.मराठवाड्यातील आठ जिल्हा परिषदांतील ४६० जागांचा विचार केला तर सर्वात जास्त १३२ जागा भाजपने पटकावल्या. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीने ११७ जागा जिंकून दुसरा क्रमांक गाठला. काँग्रेस ९८ जागांवर तिसऱ्या, तर शिवसेना ८७ जागा जिंकून चौथ्या स्थानावर फेकली गेली. यापूर्वीच्या निवडणुकीत हिंगोली जि.प. ची सत्ता शिवसेनेने स्वबळावर मिळवली होती. यावरून सेनेच्या या गडाची किती मोठ्या प्रमाणावर पडझड झाली हे दिसते. गड राखण्यासाठी त्याची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागते, मजबुतीकरण करावे लागते. किल्लेदारांच्या बदल्या केल्या की नवे किल्लेदार जोमाने काम करतात; पण शिवसेनेने मराठवाड्याच्या गडाकडे फारसे लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण अजून थांबत नाही. पराभवाच्या फटक्यांनी जागे होण्यापेक्षा हा पक्ष बधिर होत चालला असे चित्र आहे. तिसऱ्या स्थानावर पक्ष असला तरी तो राष्ट्रवादीसोबत तीन ठिकाणी सत्तेवर येऊ शकतो. या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी ठीक राहिल्याचे दिसले. भाजपपाठोपाठ त्यांची ताकद दिसून आली. मराठवाड्यात औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण याचेही बुरूज ढासळले.