शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कथ्थकसम्राट संदीप महावीरविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: March 1, 2017 06:19 IST

फसवणूक केल्याप्रकरणी कथ्थकसम्राट संदीप महावीर यांच्याविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : शेअर ब्रोकरला पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कथ्थकसम्राट संदीप महावीर यांच्याविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे कलाक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत. महावीर हे देशातील प्रसिद्ध कथ्थकसम्राट असून, त्यांचे देश-विदेशांत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. बिस्मिला खान युवा पुरस्काराने महावीर यांना सन्मानित करण्यात आले होते. मरिन ड्राइव्ह परिसरात तक्रारदार मनिष शहा हे कुटुंबासोबत राहतात, ते शेअर ब्रोकर आहेत. महावीर दिवसातून दोन तास त्यांच्या पत्नीला कथ्थक शिकवायला येते होते. या दरम्यान शहा यांच्यासोबत त्यांची ओळख वाढली. त्यात व्यावसायिक व्यवहारांच्या चर्चाही होत होत्या. महावीर यांनी शहा यांना नृत्याच्या कार्यक्रमांत पैसे गुंतविण्यास सांगितले. यात जास्तीचे पैसे मिळण्याचे आमिष दाखविल्याने शहाही तयार झाले. त्यांनी यामध्ये तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र पैसे गुंतवूनही काही फायदा होत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा मात्र महावीर त्यांना टाळू लागले. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहा यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)