शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' बेपत्ता विमानात निगडीतला कुणाल

By admin | Updated: July 24, 2016 17:48 IST

चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला जाणारे भारतीय हवाईनदलाचे विमान शुक्रवारी बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झाले.

ऑनलाइन लोकमतपिंपरी-चिंचवड, दि. 24 - चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला जाणारे भारतीय हवाईनदलाचे विमान शुक्रवारी बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झाले. त्या विमानातील २९ जणांमध्ये निगडीतील फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुणाचा समावेश असून विमान बेपत्ता झाल्याची बातमी कानी पडल्यापासून कुणालचे आई, वडील, भाऊ, नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या, इंटरनेटवर यावरून काही माहिती मिळते का ? कुणाल सुखरूप आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचा जीव कासावीस झाला आहे. ते सातत्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.निगडी, प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीत राहणारे बारपट्टे कुटुंबीय,राजेंद्र आणि विद्या बारपट्टे या दांपत्याचा २८ वर्षाचा मुलगा कुणाल बेपत्ता झालेल्या विमानात नेव्हीगेटर म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी विमान बेपत्ता होण्याची घटना घडली. रविवारी तिसरा दिवस उजाडला. संरक्षण खात्यातर्फे शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असूनही विमानाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कुणालच्या कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली आहे. पहिल्यापासून आवड असल्याने कुणाल हवाई दलात २००८ ला रुजू झाला. त्याचा लहान भाऊ सत्येंद्र आॅस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत आहे. विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यापासून सत्येंद्रसुद्धा सातत्याने कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने कुणाल यांच्या आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कुणाल यांचे मामा दिनेश पाटील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.