शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणातून कुमारीमाता

By admin | Updated: March 12, 2016 04:09 IST

आदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू...

सुरेश लोखंडे,  ठाणेआदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू... याच्या करुण कहाण्या येथील पाड्यांवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला ऐकायला मिळाल्या. दोन अल्पवयीन आदिवासी मुलींनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांना भाग पाडले. अन्यथा, पोलिसांच्या लेखी आदिवासी मुलींच्या अब्रूचे काही मोलच नाही.आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड तालुक्यातीलपोलीस ठाण्यात बनी पारधी व सुनी भोईर (दोघींचेही नाव बदलले आहे) यांनी तक्रार दाखल केल्यानंतरही अजून आरोपींना अटक झालेली नाही.कुपोषित बालकांना जन्म देणाऱ्या बहुतांश माता अल्पवयीन आहेत. त्यापैकी अनेकींची लहान वयात लग्ने करून दिली आहेत, तर काही मुली कुमारीमाता बनल्या आहेत. याखेरीज, काही अल्पवयीन मुली वासनांध प्रवृत्तीच्या शिकार बनल्या आहेत. या मुलींनी गर्भपात करावे, याकरिता त्यांना धमकावले जाते, तर पोलीस ठाण्यात जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करणे, हे त्यांच्याकरिता फारच शौर्याचे लक्षण आहे. पालकांचे या मुलींकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने बलात्कार झाला तरी त्याची घरात दखल घेतली जात नाही. गर्भपाताची सक्ती पालकच करतात किंवा गर्भपात अशक्य असेल तर मूल जन्माला घालतात व मूग गिळून गप्प बसण्यास भाग पाडतात. इयत्ता ११वीत शिकणारी बनी पारधी (नाव बदलले आहे) मावशीच्या घरी राहून कॉलेजला जात असे. मावशी सुनीता बोत्रा हिला वाडा तालुक्यातील सर्वदास भोईर याने पैशांचा पाऊस पाडतो, बनीला घेऊन ये, असे सांगितले. भोईरच्या मोटारसायकलवरून सुनीताने बनीला शेतावर नेले. तोपर्यंत बनीला कसलीही कल्पना नव्हती. शेतातील एक घरात तिच्या अंगाला हळद, कुंकू, गुलाल याने माखून टाकल्यानंतर सर्वदासने तिच्या मावशीसमोर बलात्कार केला. मावशी आणि भोईरच्या तावडीतून कशीबशी सुटका करून बनी घरी आईकडे आल्यानंतर तिला सर्व प्रकार सांगितला. मात्र, बनी आणि तिच्या आईला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. बनीच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झालेला असल्याने दीर्घकाळ बनी बलात्काराची सल मनात ठेवून होती. बालापूरच्या पाटीलपाडा येथील सुनी भोईर (वय १४) (नाव बदलले आहे) हिच्या आईच्या मृत्यूनंतर ती भावंडांना घेऊन रात्रीची शेजारच्या सुभाष व सुधा गायकवाड या कुटुंबाच्या घरी झोपायला जात असे. वडील कामाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असत. याचाच गैरफायदा घेत सुभाषने सुनीवर बलात्कार केला. सुनीने ही गोष्ट सुभाषची पत्नी सुधाला सांगितली. यानंतर, सुधाने घरी येण्यास सुनीला बंदी घातली. तीन भावंडांसोबत सुनी आपल्या घरी झोपत असतानाही सुभाष रात्रीचा येऊन तिच्यावर जबरदस्ती करीत होता. कुणाला सांगू नको; अन्यथा ठार करीन, अशी धमकी सुभाष सतत देत असे. दरम्यानच्या कालावधीत सुनी गर्भवती असल्याचे लक्षात येताच सुभाष व सुधा यांनी तिला आंबिस्ते गावात नेऊन तिचा गर्भपात केला, असे सुनीने सांगितले. आता ती वडिलांसोबत उपराल या गावी राहते. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना हे कळल्यावर त्यांनी पोलिसांना तक्रार घेण्यास भाग पाडले. मात्र, अजून आरोपींना अटक झालेली नाही. अत्याचार करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीकरिता विक्रमगड पोलीस ठाण्याबाहेर सकाळपासून आंदोलन सुरू होते. मात्र पोलिसांनी सायंकाळपर्यंत आंदोलनाची दखलही घेतली नव्हती.