शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेणार

By admin | Updated: June 29, 2016 02:05 IST

विक्रोळीच्या विकासकावर खंडणीसाठी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने गँगस्टर कुमार पिल्लेला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : विक्रोळीच्या विकासकावर खंडणीसाठी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने गँगस्टर कुमार पिल्लेला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहेत. यापूर्वी २००९मध्ये गुन्हे शाखेने त्याचा आवाज रेकॉर्ड केला होता. दोन्ही आवाजाच्या नमुन्यांत साम्य आहे का, याची पडताळणी करून तपासाला सुरुवात होणार आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ७चे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांचे पथक तपास करत आहे. २००९ साली रमेश शहा या विकासकाला खंडणीसाठी धमकावून हत्येचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ लोढा या विकासकाच्या कार्यालयात घुसून त्याने गोळीबार केला होता. २०१३मध्ये मनसे आमदार मंगेश सांगळे यांना खंडणीसाठी धमकावले होते. या तीन गुन्ह्यांचा सखोल तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे. शहा यांच्याकडून पिल्लेने ५० लाखांची खंडणी मागितली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. यातील तिघांना मोक्का न्यायालयाने दोषी ठरविले होते; तर कुमार पिल्लेला फरार घोषित केले होते. कुमार पिल्ले हा ‘केपी’ नावाने पूर्व उपनगरात टोळी चालवित होता. १९९७ साली पिल्लेने मुंबई सोडली आणि तो हाँगकाँगला गेला. २०१२ साली मुंबई पोलीस आणि इंटरपोलने पिल्लेविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी केली. त्याने हाँगकाँगचे नागरिकत्व घेतले. अखेर त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचे सहआयुक्त गुन्हे संजय सक्सेना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आईने केला भेटण्याचा प्रयत्नपिल्लेला घेऊन तपास पथक मुंबई विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्याची आई त्याला भेटण्यासाठी तेथे आली होती. मात्र पोलीस पिल्लेला घेऊन थेट निघाल्याने त्यांची भेट झाली नाही.