शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ-मालवणमधून लढणार

By admin | Updated: September 15, 2014 02:27 IST

यावेळी राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली

कणकवली : भाजप व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकीय स्वार्थापोटी वाद सुरू आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नसून, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आमचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, असे सांगतानाच पक्षाच्या आदेशाप्रमाणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे ंजाहीर केले.उद्योगमंत्री राणे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून, कणकवली येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभेतील काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबरला या निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. विरोधकांनी जनतेची केलेली फसवणूक, दिलेल्या आश्वासनांची न केलेली पूर्तता, वाढती महागाई, असे मुद्दे घेऊन आम्ही प्रचारात उतरणार आहोत. देशाची परिस्थिती विचारात न घेता केंद्र शासनाकडून नियोजन केले जात असल्यानेच ‘जन-धन’सारख्या योजना फसत आहेत. त्यामुळे हे मुद्देही प्रचारात उपस्थित केले जाणार आहेत. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे यांचाही समावेश प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये असेल. महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, राज्य चालविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांचा दुष्काळ भाजप तसेच शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच कौल देईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबतची सूत्रे दोन-चार दिवसांत निश्चित होतील, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, सिंधुदुर्गसह कोकणात काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून नीतेश राणे यांचे एकमेव नाव असून, उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. कासार्डे एमआयडीसी तेथील जनतेला नको असल्याने रद्द केली आहे. तेथील जनता ज्यावेळी एमआयडीसी आपल्याला हवी असे सांगेल, त्यावेळी पुन्हा त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)