शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

क्षीरसागरांनी गड राखला

By admin | Updated: June 13, 2016 23:21 IST

बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जोरदार मुसंडी मारली. शिवसेना, भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइं

महाआघाडीचा सफाया : कृउबा निवडणुकीत घड्याळाचा गजर; सर्वच जागांवर दणदणीत विजयबीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जोरदार मुसंडी मारली. शिवसेना, भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइं व तीन माजी आमदारांनी एकत्र येऊन महाआघाडीची मोट बांधली होती; परंतु आ. जयदत्त क्षीरसागरांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. महाआघाडीला भोपळाही फोडता आला नाही. सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून क्षीरसागरांनी बाजार समितीचा गड तर अभेद्य राखलाच शिवाय बीड मतदारसंघात आपला दबदबाही कायम ठेवला.२५ वर्षांपासून क्षीरसागरांचे वर्चस्व असलेल्या बाजार समितीतील सत्तेला सुरूंग लावण्यासाठी विरोधक एकवटले होते. महाआघाडीच्या माध्यमातून त्यांनी क्षीरसागरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी रविवारी १७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. तीन हजार २०८ पैकी तीन हजार १२९ मतदारांनी हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून बार्शी रोडवरील मजूर फेडरेशनच्या कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत व हमाल-मापाडी गटातील सर्वच जागांवर राकाँ पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीने विजयाची मोहोर उमटवली.दुसरीकडे महाआघाडीच्या परिवर्तन पॅनलला साधे खातेही खोलता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जगदाळे यांनी काम पाहिले. विजयाची घोषणा होताच राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळून कार्यकर्त्यांची मिरवणूक आ. क्षीरसागर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. तेथे आ. क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी मंत्री बदामराव पंडित, रवींद्र क्षीरसागर, राकाँ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि. प. सभापती संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, अ‍ॅड. डी. बी. बागल, भारत सोन्नर, पवन तांदळे, शाहेद पटेल आदी उपस्थित होते.तथापि, कृउबा निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून बबनराव गोरे, राधेश्याम कासट हे राकाँचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. व्यापारी मतदार संघात घेतलेली आघाडी क्षीरसागरांनी शेवटपर्यंत कायम राखत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. क्षीरसागर गटाच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या फरकांनी विजयाचा गुलाल लावला.पराभवाची चिन्हे दिसताचकाढता पायसेवा सोसायटी मतदार संघातील निकाल बाहेर आले आणि कृउबामध्ये आ. क्षीरसागरांचीच सत्ता अबाधित राहिल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. त्यामुळे मतमोजणीस्थळी निकाल ऐकण्यासाठी आलेल्या शिवसेना, भाजप, शिवसंग्रामचे पदाधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)यांची वर्णी : मोठ्या फरकाने नोंदवला विजयसेवा सहकारी संस्था सर्वसाधारण : दिनकर कदम (१०९४ मते), गंगाधर घुमरे (१०४४), अरूण डाके (१०७७), गणपत डोईफोडे (१०७१), अच्युत मोरे (१०७०), शिवाजी येडे (१०६०), शेख हबीब शेख महेबूब (१०३८)सेवा सहकारी संस्था महिला : सिंधू अरबने (११२९), सुमित्रा घोडके (११३४)सेवा सहकारी संस्था इ. मा. व. : भीमराव काळे (११६८), अनिरूद्ध निर्मळ (११४५)ग्रामपंचायत सर्वसाधारण : बळीराम गाडे (८७५), परमेश्वर सातपुते (८८८)ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती : प्रमिला सोनवणे (८९७)ग्रामपंचायत दुर्बल घटक : स्वाती बोबडे (८९७)हमाल-मापाडी मतदारसंघ : हनुमान जगताप (११५)