शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

क्षत्रिय, मनुकुमार यांना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: November 27, 2014 00:24 IST

उपराजधानीतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, रखडलेले प्रकल्प, अतिक्रमण इत्यादी बाबींसंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाचे मुख्य सचिव

अवमानना नोटीस जारी : व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे निर्देशनागपूर : उपराजधानीतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, रखडलेले प्रकल्प, अतिक्रमण इत्यादी बाबींसंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालय अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली. तसेच, दोन्ही अधिकाऱ्यांना १० डिसेंबर रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या २५ जून रोजी न्यायालयाने उपराजधानीत कोठे-कोठे वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या आहे हे शोधून काढणे आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊन समितीला तीन महिन्यांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या आदेशाला पाच महिने लोटूनही समितीने समाधानकारक कार्य केले नाही. समितीची पहिली बैठक २१ आॅक्टोबर रोजी मुंबईत घेण्यात आली. बैठकीत विषयाच्या प्राथमिक अभ्यासाकरिता उपसमिती स्थापन करण्यात आली. शासनाने प्रतिज्ञापत्रावर ही माहिती दिल्यानंतर न्यायालय संतप्त झाले. त्यांनी शासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढून वरीलप्रमाणे निर्देश दिलेत.