शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालचे सुपुत्र दिलीप शिंदे शहीद

By admin | Updated: October 5, 2015 02:31 IST

नरवीर तानाजी मालुसरे यांचा लढवय्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्याच्या शहीद परंपरेत कोतवालचे सुपुत्र दिलीप नारायण शिंदे

पोलादपूर : नरवीर तानाजी मालुसरे यांचा लढवय्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्याच्या शहीद परंपरेत कोतवालचे सुपुत्र दिलीप नारायण शिंदे यांचाही समावेश झाला आहे. शनिवारी सायंकाळी नेपाळ सीमेवर देशसेवेत असताना झालेल्या अपघातात दिलीप शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली. तालुक्यातील आतापर्यंतचे ते १५वे शहीद ठरले आहेत.कोतवाल रेववाडी येथील दिलीप नारायण शिंदे यांचे वडील नारायण शिंदे यांनी भारतीय सैन्यामध्ये देशसेवा केल्यानंतर दिलीप शिंदेदेखील वडिलांच्या आदर्शानुसार भारतीय सैन्यात भरती झाले. त्यांच्यावर २३ मराठा इन्फ्रंट्री बेळगाव सेंटरमधून नेपाळ सीमा भागात सीमा संरक्षणाची जबाबदारी होती. शनिवारी नेपाळ सीमेवर सेवा बजाविताना त्यांच्या लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी दिलीप नारायण शिंदे यांचे पार्थिव पोलादपूर तालुक्यातील त्यांच्या कोतवाल रेववाडी येथील निवासस्थानी लष्करी इतमामात अंत्यसंस्कारासाठी आणले जाणार आहे.३२वर्षीय दिलीप यांनी वडील नारायण शिंदे यांच्या मृत्यूनंतर १० वर्षे भारतीय सैन्यात सेवा केली. त्यांनी विविध खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त करण्यासोबत पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाच्या जोपासनेचा संदेश पोहोचविण्यासाठी सायकल भ्रमणही केले. त्यांच्या पश्चात आई चंद्राबाई शिंदे, पत्नी उज्ज्वला शिंदे, भाऊ दीपक व सुरेश, बहीण ललिता असा परिवार आहे. त्यांचे दोघे भाऊ कोतवाल खुर्द येथे शेतकरी असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. (वार्ताहर)