शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘कोपर्डी’ अत्याचार : कट रचून खून केल्याचा आरोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:11 IST

कोपर्डी खटल्यातील तीनही आरोपींनी कट रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे सकृतदर्शनी पुराव्यातून स्पष्ट होत आहे.

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील तीनही आरोपींनी कट रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे सकृतदर्शनी पुराव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरोपींवर कट, अत्याचार व खुनाचा आरोप ठेवण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे न्यायालयासमोर करण्यात आला़ घटनेच्या चार दिवस आधी तीनही आरोपींनी पीडित मुलीची छेड काढली होती़ मुलीने विरोध केल्याने, आरोपींनी कट रचून हे कृत्य केल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले. जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारपासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली. बुधवारी आरोपींना हजर करण्यात आले होते़ निकम यांनी आरोपींवर दोषारोप निश्चितीसाठी युक्तिवाद केला़ गुरुवारी आरोपींतर्फे त्यांचे वकील योहान मकासरे, प्रकाश आहेर हे युक्तिवाद करणार आहेत़ न्यायालयासमोर दोषारोपाची जंत्री सादर करताना, अ‍ॅड. निकम यांनी प्रथम घटनेची पार्श्वभूमी कथन केली़ कोपर्डीत १३ जुलैच्या अत्यंत संतापजनक घटनेच्या चार दिवस आधी ही मुलगी शाळेतून घरी येत असताना, आरोपी शिंदे याने तिची छेड काढली़ तेव्हा त्याच्यासमवेत भवाळ व भैलुमे उपस्थित होते़ छेडछाडीला विरोध केल्याने, आरोपींनी मुलीला धमकी दिली होती़ त्यानंतर, चार दिवसांतच अत्याचार व हत्येची घटना घडली़ घटनेच्या दिवशी दोन आरोपी घटनास्थळाजवळील रस्त्यावरून दुचाकीवरून फिरत होते़ घटनास्थळापासून मुलीचे कपडे व तिचा मृतदेह लांबवर विरुद्ध दिशेने होता. हे काम एकटा आरोपी करू शकत नाही,असे स्पष्ट होत असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले. गुन्ह्याचा पंचनामा आणि घटनास्थळाचा नकाशा, याकडेही न्यायालयाचे त्यांनी लक्ष वेधले़ कोपर्डी खटल्याची तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती सरकारी पक्षातर्फे निकम यांनी न्यायालयाकडे केली आहे़ खटल्यात एकूण ७० साक्षीदार तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)>जामीन अर्जावर आज सुनावणी आरोपी नितीन भैलुमे याने जामिनासाठी अर्ज केला असून, खटल्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे़ त्याबाबत सरकारी पक्ष व आरोपीतर्फे गुरुवारी बाजू मांडण्यात येणार आहे़