शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी - खटला दुसऱ्या जिल्ह्यात चालवा

By admin | Updated: November 10, 2016 06:34 IST

कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील तिघा आरोपींविरोधात बुधवारी जिल्हा न्यायालयात अल्पवयीन मुलीवर कट रचून अत्याचार व खून केल्याचा दोषारोप निश्चित करण्यात आला़

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील तिघा आरोपींविरोधात बुधवारी जिल्हा न्यायालयात अल्पवयीन मुलीवर कट रचून अत्याचार व खून केल्याचा दोषारोप निश्चित करण्यात आला़ तिसरा आरोपी नितीन भैलुमेने खटला दुसऱ्या जिल्ह्यात चालवावा, अशी मागणी केली. याबाबत उच्च न्यायालयात अर्ज करण्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले़ कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ बुधवारी दोषारोप ठेवलेल्या जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे (तिघे रा़ कोपर्डी, ता़ कर्जत) यांच्याविरोधात कट करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केल्याचा दोषारोप निश्चित करण्यात आला़ आरोपींना जिल्हा न्यायालयात आणतेवेळी त्यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी देण्याचे प्रकार झाल्याने खटला दुसऱ्या जिल्ह्यात चालवावा, अशी मागणी भैलुमेचे वकील प्रकाश आहेर यांनी केली. भैलुमेच्या घराला पोलिसांनी टाळे लावल्याने उच्च न्यायालयात व इतर कामकाजास लागणारी कागदपत्रे घेता आली नाहीत़ त्यामुळे हे घर पोलिसांनी उघडून द्यावे, अशी मागणी आहेर यांनी केली़ त्यावर सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी भूमिका स्पष्ट करत न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. भैलुमे याच्या घराला कसलेही टाळे लावले नसल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)सुनावणी तहकूब आरोपी भैलुमे याला खटल्यातून वगळावे यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे़ तसेच त्याचे रेशन कार्ड व शैक्षणिक कागदपत्र घेणे बाकी असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी तात्पुरती स्थगित केली आहे़ खटल्याची २० ते २३ डिसेंबर सुनावणी होणार असून, सरकारी पक्षाच्या वतीने १६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या जाणार आहेत़ भैलुमेचे वकील आहेर यांनी तपासादरम्यान कर्जत पोलीस व तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाइकांना गावातून हाकलल्याचा आरोप केला़ खटल्यात खोटी साक्ष देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे सांगितले़ मात्र सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ निकम यांनी हा साक्षीदारांना धमकाविण्याचा प्रकार असल्याचा युक्तिवाद करत आहेर यांच्या मुद्द्याला विरोध केला़