शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कोपर्डी प्रकरणात बचाव पक्षाला हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष

By admin | Updated: June 23, 2017 14:27 IST

कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 23 - कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे. बचाव पक्षाला ज्यांची साक्ष काढायची आहे, अशांची यादी दिली असून त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचंही नाव आहे. अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील  तिसरा आरोपी नितीन भैलूमेचा जबाब नोंदवण्यात आला.  यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करवा, अशा मागणीचा अर्ज दिला आहे.

आरोपीचे वकील प्रकाश अहेर यांच्याकडून न्यायालयात अर्ज सादर 

विधानसभेत आणि एका वृत्तवाहिन्याच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा साक्षीदारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.  

दरम्यान, गुरुवारी कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची एक यादी दिली. विशेष म्हणजे या यादीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं.

 कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासावर बचाव पक्षाला आक्षेप होता. खटला उभा राहिल्यानंतर सरकारी वकील काम सुरू करतात. मात्र खटल्यात सरकारी वकिलांनी काम सुरू केलं नसल्याचा दावा बाळासाहेब खोपडे यांनी केला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.

विशेष म्हणजे भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तर  कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची न्यायालात चार तास मॅरेथॉन चौकशी झाली़ असून, सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 26

साक्षीदारांची

तपासणी झाली आहे.

 

अजून तीन जणांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही

दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता अॅड. उज्ज्वल निकम यांचीच साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आल्यानं खळबळ उडाली

आहे. 

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवारे यांची साक्ष घेतली़, गवारे यांनी अत्याचार आणि खुनाशी संबंधित तक्रार व तपासाची माहिती दिली आहे.

कोपर्डी घटनेतील आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याला 15 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या जबाबानंतर या घटनेत संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही दोन दिवसांच्या अंतराने अटक करण्यात आली़ होती. शिंदे याच्या घराची झडती घेतली होती, तेव्हा तेथे मोबाइल व काही अश्लील सीडी आढळून आल्या होत्या.