शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटला: मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची सीडी न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 03:51 IST

कोपर्डी खटल्यातील आरोपीच्या भावाने केलेल्या विनंतीवरून माध्यमांत प्रसारित झालेल्या बातम्यांच्या तयार केलेल्या सीडी बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी न्यायालयात सादर केल्या.

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपीच्या भावाने केलेल्या विनंतीवरून माध्यमांत प्रसारित झालेल्या बातम्यांच्या तयार केलेल्या सीडी बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी न्यायालयात सादर केल्या. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विनोद तावडे, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर कोपर्डी संदर्भात दिलेल्या निवेदनाचे व्हिडीओ असलेल्या सीडींचा समावेश आहे.भवाळ याला कायदेशीर मदत व्हावी, या उद्देशातून या सीडी तयार केल्याची साक्ष बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी न्यायालयात दिली़ कोपर्डी खटल्याची येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी चव्हाण यांची सरतपासणी व उलट तपासणी झाली़ भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी चव्हाण यांची सरतपासणी घेतली़ त्यानंतर सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड़ निकम यांनी उलट तपासणी घेतली़कोपर्डी येथील घटनेनंतर आरोपी संतोषचा भाऊ बाळू भवाळ याने तुमच्याकडे कोणती मदत मागितली, या अ‍ॅड. निकम यांच्या प्रश्नावर चव्हाण यांनी न्यायालयात सांगितले की, भवाळ याने आर्थिक मदत व रोजगार देण्याची तसेच कायदेशीर मदत मागितली होती़ त्यानंतर माध्यमांत प्रसारित झालेले वार्तांकन हे ‘यू ट्यूब’वरून डाऊनलोड करून त्याच्या सीडी तयार केल्या. बचाव पक्षाने दिलेल्या सीडीपैकी एका सीडीतील व्हिडीओ न्यायालयात दाखविला़ त्यात अ‍ॅड़ निकम हे एका चॅनेलवर बोलताना दिसत आहेत़ हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा निकम यांनी केला़ पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी होणार आहे़

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस