शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या गाड्यांना लेट मार्क ?

By admin | Updated: January 8, 2015 01:50 IST

मध्य रेल्वेकडून ९ जानेवारी रोजी पेण ते कासू, कासू ते नागोठणे आणि नागोठणे ते रोहा दरम्यान दुहेरीकरणाच्या अभियांत्रिकी कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेकडून ९ जानेवारी रोजी पेण ते कासू, कासू ते नागोठणे आणि नागोठणे ते रोहा दरम्यान दुहेरीकरणाच्या अभियांत्रिकी कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.५0 ते सायंकाळी १६.२0 पर्यंत असणाऱ्या ब्लॉकमुळे कोकणमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा लेटमार्क लागण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. काही ट्रेनचा शेवटचा थांबा बदलण्यात आला आहे. ट्रेन नंबर ७१0८९ दिवा-रोहा डिझेल ट्रेन ही दिवावरुन सकाळी ९.१0 वाजता सुटेल. मात्र ती पेणपर्यंतच धावेल. तर ट्रेन नंबर ७१0९६ रोहा-दिवा ट्रेनही सायंकाळी १६.२४ वाजता पेणहून सोडण्यात येईल. या दोन्ही ट्रेन रोहा ते पेण दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. या दिवशी धावणारी ट्रेन नंबर १६३४५ एलटीटी ते थिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ११.४0 च्या ऐवजी दुपारी १४.२0 वाजता सुटेल. ट्रेन नंबर १0१११ सीएसटी ते मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस १0 जानेवारी रोजी रात्री २३.0५ वाजण्याच्या ऐवजी 00.२0 वाजता सुटेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)डाऊन ट्रेन : ट्रेन नंबर १९२६२ पोरबंदर ते कोच्चुवेल्ली एक्सप्रेस, १२६१९ एलटीटी ते मेंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस, ५0१0३ दादर ते रत्नागिरी पॅसेंजर, १२२0१ एलटीटी ते कोच्चुवेल्ली गरीब रथ एक्सप्रेस ब्लॉकवेळी जीते आणि पेण दरम्यान नेहमीप्रमाणे धावेल. रोहापासून ४५ मिनिट ते चार तास उशिराने धावतील. अप ट्रेन : ट्रेन नंबर १६३४६ थिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस, १२४३१ थिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीम राजधानी एक्सप्रेस, ५0१0६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, १0१0४ मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेस, २२९0७ मडगाव-हापा एक्सप्रेस, १२२५९ कोच्चुवेल्ली-भावनगर एक्सप्रेस, १२0५२ करमाळी -दादर टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन रोहापर्यंत सुरळीत धावतील. त्यानंतर या ट्रेनला ४0 मिनिटे ते साडे तीन तासांचा लेटमार्क लागू शकतो.