शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग अखेर ‘ट्रॅकवर’

By admin | Updated: July 20, 2015 01:30 IST

: दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वेला आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. हे पाहता कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे

मुंबई : दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वेला आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. हे पाहता कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आम्हाला याबाबतचे मंजुरीचे पत्र अद्याप मिळणे बाकी असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानु प्रकाश तायल यांनी सांगितले. एकच रेल्वे मार्ग उपलब्ध असल्याने कोकण रेल्वे मार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होते. यात काही वेळा तर कोकण रेल्वे पुर्ववत होण्यास एक दिवसही लागतो. जर एखादा दुसरा मार्ग उपलब्ध असल्यास कोकण रेल्वेवरील सेवा ही थोडी का असेना पण पुर्ववत राहू शकते. त्यासाठी कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. ही मागणी पाहता कोकण रेल्वेकडून दुहेरीकणाचा प्रस्तावही मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळून दुहेरीकरण होणार तरी कधी असा प्रश्न कोकण रेल्वेबरोबरच प्रवाशांनाही पडला होता. अखेर या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानु प्रकाश तायल यांना विचारले असता, दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंरतु अजून या मंजुरीचे पत्र आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे दुहेरीकरण कसे आणि कोणत्या टप्प्यात आहे, ही बाब स्पष्ट झालेली नाही. पत्र आले की सर्व बाबी स्पष्ट होतील. त्यामुळे दुहेरीकरणाचा तिढा सुटलेला आहे.