शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेला आता तुतारीची साद

By admin | Updated: May 19, 2017 22:45 IST

कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्यांपैकी दादर-सावंतवाडी या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्यांपैकी दादर-सावंतवाडी या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून तुतारी एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. मुंबईतल्या दादर येथे झालेल्या रेल्वेच्या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलण्यात आले आहे.दादर-सावंतवाडी ही ट्रेन कोकण मार्गावर 1 जुलै 2011 रोजी राज्यराणी एक्स्प्रेस नावाने कोकणवासीयांच्या सेवेसाठी सुरू केली. त्यामुळे रात्रीच्या दरम्यानच आरामदायी प्रवास करून पहाटे कोकणात दाखल होणं शक्य झालं. त्यामुळे प्रवाशांची या ट्रेनला सर्वाधिक गर्दी असते. कोकणातील चाकरमन्यांसाठी दादर-सावंतवाडी ही ट्रेन सर्वाधिक आवडीची आहे. केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाणारे मराठी कवी कृष्णाजी केशव दामले यांच्या सन्मानार्थ दादर-सावंतवाडी ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. केशवसूत यांची तुतारी ही कविता जनमानसात लोकप्रिय असल्यानं ते नाव या ट्रेनला देण्यात आलं आहे. त्यामुळे दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून तुतारी एक्स्प्रेस ठेवण्यात आले आहे. ब्रिटिशांच्या कार्यकाळात केशवसुतांनी तुतारी कविता बनवली. या कवितेतून केशवसुतांनी ब्रिटिशांविरोधात एकत्र येण्याचे आणि पेटून उठण्याचे आवाहन केले. केशवसुतांच्या तुतारी कवितेने अनेकांना ब्रिटिशांविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कवी कृष्णाजी केशव दामले यांचा जन्मही कोकणातच झाला आहे.