शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

चार महिन्यांआधीच कोकण रेल्वे आरक्षित

By admin | Updated: May 9, 2016 03:41 IST

रेल्वेच्या नव्या नियमानुसार नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांआधीच सुरू करण्यात आले. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात धाव घेणाऱ्या चाकरमान्यांनी या सेवेला तुफान प्रतिसाद दिला

मुंबई : रेल्वेच्या नव्या नियमानुसार नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांआधीच सुरू करण्यात आले. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात धाव घेणाऱ्या चाकरमान्यांनी या सेवेला तुफान प्रतिसाद दिला. ३ सप्टेंबरपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण काही तासांतच फुल्ल झाले आहे.चार महिने अर्थात १२० दिवसांआधी आरक्षण उपलब्ध केल्याने सहज आरक्षण उपलब्ध होईल, अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाकरमान्यांनी कोकणातील गाड्यांचे आरक्षण केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन गणेशोत्सवात कोकणासाठी किती जादा गाड्या सोडणार, याची प्रतीक्षा चाकरमान्यांना लागली आहे.बहुसंख्येने कोकणवासीय गणेशोत्सवात रेल्वे सेवेचा वापर करतात. त्यासाठी चार महिने आधी आरक्षण सुरू केल्यास सोयीस्कर ठरेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला होती. मात्र कोकणवासीयांनी गाड्यांच्या आरक्षणाला चार महिन्यांआधीच दिलेल्या प्रतिसादाने ती फोल ठरली आहे. (प्रतिनिधी)गणेशोत्सवाच्या ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत कोकणाकडे धावणाऱ्या कोकणकन्या, राज्यराणी, जनशताब्दी आणि मांडवी एक्स्प्रेस या सर्व गाड्यांची प्रतीक्षा यादी ५००वर गेली आहे. रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवात जादा गाड्या चालवण्यात येतात. मात्र तरीही कोकणवासीयांची पहिली पसंती याच गाड्यांना असते.> डबलडेकरला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नेहमीच होत असतो. मात्र गणेशोत्सवात डबलडेकर गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ३००हून अधिक प्रतीक्षायादी असल्याची माहिती देण्यात आली आहे.> गाडीचे नाव दिनांकनिहाय प्रतीक्षायादीची सद्य:स्थिती३ सप्टेंबर४ सप्टेंबर५ सप्टेंबरएक्स्प्रेस४०० (स्लीपर)४०१ (स्लीपर)१७८(स्लीपर) मांडवी५२३ (स्लीपर)४०१ (स्लीपर)३० (स्लीपर)कोकणकन्या४०१ (स्लीपर)४७८ (स्लीपर)२२ (स्लीपर)जनशताब्दी३९५४०११४७दिवा-सावंतवाडी पॅसेंजर१०११०१८६