शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात राजकीय ‘घूम’शान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 04:30 IST

ऐन पावसाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत कोकणच्या विकासा

लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : ऐन पावसाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत कोकणच्या विकासाचे गाऱ्हाणे घातल्याने कोकणवासीय अक्षरश: चिंबचिंब झाले. आजवर एकमेकांच्या नावे शिमगा करणारे काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याचा अपूर्व योग यानिमित्ताने जुळून आल्याने हे कौतिक पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.मुंबई ते झाराप या मार्गावरील शेवटच्या चौथ्या टप्प्याच्या मार्गाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह सुरेश प्रभू, अनंत गिते, रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राणे यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी स्वागत फलक लावले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस व गडकरींचे फोटो असल्याने राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, स्थानिक आमदार म्हणून सर्वांचे स्वागत करणे, हे आमचे कर्तव्य असल्याचे आ.नितेश राणे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. नारायण राणे यांनी आपल्या भाषणात सर्वांचा उल्लेख करत विकासासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडली. तर उद्धव ठाकरे यांनी राणे यांचा उल्लेख ह्यमाझे पूर्वीचे सहकारीह्ण असा केला. एकाच छताखाली वेगवेगळ्या घोषणा देतो, पण विकासासाठी आपण एकत्र आलो याचे समाधान आहे. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये, राजकारण राजकारणाच्या दिशेला असावे म्हणत उद्धव यांनीही राणेंच्या व्यक्तव्याला दुजोरा दिला. गडकरी म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील रस्ता पूर्ण होत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. कोकणच्या विकासात सर्व जण एकत्र येऊन काम करीत असून, आता कोकणला विकासापासून कोणही रोखू शकणार नाहीत. मुंबई ते गोवा एकूण महामार्गाचे ११ टप्पे करण्यात आले असून, सर्व कामे एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. भूसंपादन करत असतानाही कुणाला नाराज करण्यात आले नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीनही जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचे ३१०० कोटी पडून आहेत. काही ठिकाणी भूसंपादनाची कामे सुरूही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याने कोकणवासीयांचा आशीर्वाद केंद्रीय मंत्री गडकरी यांना मिळेल. कोकणात लवकरच ताज ग्रुप पंचतारांकित हॉटेल सुरू करणार आहे. त्या माध्यमातून येथील पर्यटन वाढेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.काँग्रेस पदाधिकारी ताब्यातकार्यक्रमस्थळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध झाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर होते. काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांनाही व्यासपीठावर घेतले पाहिजे, याकरिता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली. या वेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे पोलिसांनी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्यासहित जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर या तीन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.