शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणीमुळे कोळी समाज नाराज

By admin | Updated: July 7, 2014 04:04 IST

राज्यातील कोळी समाजाच्या दाखल्यासंदर्भात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे.

मुंबई : राज्यातील कोळी समाजाच्या दाखल्यासंदर्भात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे. येत्या सात दिवसांत सरकारने सेवेत असलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण दिले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिला आहे.अनुसूचित जाती व जमातीमधील कर्मचाऱ्यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र तपासणीचे कारण देत शासन कोळी समाजाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संख्येत कपात करीत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले, युती सरकारने १५ जून १९९५ साली परिपत्रक काढत कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण दिले होते, मात्र आघाडी सरकार ते संरक्षण काढून घेत आहे. परिणामी, २०१० सालापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण देण्यात यावे, नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी सरकारला कोळी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. जातपडताळणी प्रमाणपत्र तपासणीमुळे केंद्र व राज्य शासनात कार्यरत असलेल्या सुमारे १५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. त्यात उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यभर बैठका आणि मेळावे घेत महासंघ तीव्र आंदोलनाची तयारी करीत आहे. राज्यातील ५ विभागांत असलेल्या ७ जातपडताळणी समित्यांच्या कार्यालयाबाहेर सुरुवातीला मोर्चा आणि निदर्शने करीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. मात्र त्यानंतर महासंघ रस्त्यावर उतरून आक्रमकरीत्या आंदोलन करीत समिती बंद करणार असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)