शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे ‘एमटीडीसी’ कार्यालय सोलापूरला

By admin | Updated: December 22, 2015 01:03 IST

भाजपचाच विरोध : पालकमंत्र्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापुरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) बंद असलेले प्रादेशिक कार्यालय सोलापूरला सुरू करण्याच्या प्रस्तावास सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन भाजपने आता चक्क पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाच दिले आहे. ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांनाच कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची पाळी आल्याचे चित्र त्यामुळे पुढे आले आहे.‘एमटीडीसी’चे कोल्हापुरातील प्रादेशिक कार्यालय सध्या बंद आहे. हे कार्यालय पूर्ववत सुरू होण्यासाठी विविध संघटना, नागरिकांनी सातत्याने आंदोलने केली आहेत. मात्र, एमटीडीसीने ८ डिसेंबर २०१५ रोजी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना पत्र लिहून सोलापूर येथे संबंधित प्रादेशिक उपकार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित केले असल्याचे कळविले आहे. त्याला कोल्हापूरकरांसह भाजपचा विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व व शौर्याची भूमी, राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ, करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिरामुळे कोल्हापूरला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. अंबाबाईसह जोतिबाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. त्यासह विविध धार्मिक, पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात औद्योगिककरण वाढत आहे. पर्यटनवाढीसाठी भविष्यात जिल्ह्यात मोठा वाव आहे. अशा स्थितीत एमटीडीसीने येथील प्रादेशिक कार्यालय सोलापूर येथे हलविणे कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला मारक ठरणारे आहे. त्याचा विचार करून हे कार्यालय पूर्ववत कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्री पाटील यांना भाजपतर्फे देण्यात आले असल्याची माहिती भाजप कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)कक्ष अधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र असेप्रादेशिक कार्यालयांतर्गत उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महामंडळाच्या संचालक मंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. सदर प्रस्तावात प्रादेशिक कार्यालय पुणेअंतर्गत कोल्हापूर येथे माहिती व आरक्षण केंद्र सुरू असल्याने, सोलापूर येथे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संचालक मंडळाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यालय करण्यात येईल, असा उल्लेख एमटीडीसीचे मुंबईतील सह. व्यवस्थापकीय संचालकांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये आहे.