शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसाठी कोल्हापूरकरांनी पाळला बंद

By admin | Updated: July 28, 2016 14:56 IST

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी हद्दवाढ समर्थक कृती समितीने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. २८ -  कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी हद्दवाढ समर्थक कृती समितीने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान चार रिक्षा फोडण्यात आल्या. एका एसटीची तोडफोड झाली. राजारामपुरीत दुकानाची काच जमावाने फोडली. कार्यकर्त्याला धरून नेणाऱ्या पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या अंगावर जमाव धावून गेल्याने कांहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले.

हद्दवाढ न झाल्यास महापालिकेच्या नगरसेवकांनी राजीनामा द्यावेत असे आवाहन माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले. कोल्हापूरची अठरा गावांसह हद्दवाढ प्रस्तावित आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या अधिसूचनेवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. परंतू त्यांच्याच पक्षाचे आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार सर्वश्री चंद्रदिप नरके व डॉ.सुजित मिणचेकर यांनी हद्दवाढीस कडाडून विरोध केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीची अधिसूचना बुधवारी स्थगित केली. हद्दवाढीस विरोध म्हणून अठरा गावांनीही बंद पाळून सरकारला इशारा दिला आहे. या सगळ््याचा परिणाम म्हणून हद्दवाढीच्या समर्थनार्थ महापौर अश्विनी रामाणे यांनीच बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून महापालिकेचे सर्व कर्मचारी काम बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले. नागरी वाहतूकीची महत्वाची व्यवस्था असलेल्या केएमटीची एकही गाडी रस्त्यावर आली नाही. या यंत्रणेचे कर्मचारीही गाड्या कार्यशाळेत लावून मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांचे कांही प्रमाणात हाल झाले. रिक्षा वाहतूक मात्र कांही प्रमाणात सुरु राहिली. चित्रपटाचा पहिला शो कांहीठिकाणी सुरु राहिला. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी बंदमध्ये भाग घेतल्याने शाळांतील उपस्थिती रोडावली. कॉलेज सुरु झाली होती परंतू बंद समर्थक कार्यकर्त्यांनी तिथे जावून कॉलेज बंद करायला भाग पाडले. नेहमी गजबजलेला महाद्वार रोड, शिवाजी चौकचा परिसर, लक्ष्मीपुरी, शाहुपूरी, राजारामपुरी ह्या व्यापारी पेठांतील व्यवहारही दुपारपर्यंत बंदच राहिले. रस्त्यावरील वर्दळही कमी होती. सकाळी बिंदू चौकातून महापौर रामाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करत फेरी काढली त्यामध्ये माजी महापौर आर.के.पोवार, उपमहापौर शमा मुल्ला, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, भाजपचे नेते महेश जाधव, संदिप देसाई, शिवसेनेचे जयवंत हारुगले, नगरसेवक नियाज खान आदी सहभागी झाले. ही फेरी राजारामपुरीत आली असता बेकरी बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यास पोलिसांनी पकडले. त्याला सोडण्यात यावे असा तगादा कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडे धरला. त्यावरून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. कांहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले.

पालकमंत्र्यांचे अभिनंदन.. कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी आग्रही असणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे यावेळी कृती समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.

आमदार-माजी आमदारांचा निषेध हद्दवाढीस विरोध केल्याबध्दल आमदार अमल महाडिक, चंद्रदिप नरके व डॉ.सुजित मिणचेकर यांचा कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांचाही हद्दवाढीस विरोध आहे. त्यामुळे त्यांचाही निषेध करण्यात आला. बंदमध्ये आमदार सतेज पाटील यांचे मोजके कार्यकर्ते सहभागी झाले. हद्दवाढीच्या मुद्द्यांवर सर्वच पक्षांत शहरी व ग्रामीण अशी फूट पडल्याचे चित्र तयार झाले आहे.