भीमगोंडा देसाई, कोल्हापूरयेथील करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे तयार केल्या जाणाऱ्या पांढऱ्या, तांबड्या रश्शासाठीच्या मसाल्यास ‘भौगोलिक उपदर्शन मानांकन’ देण्यास केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून, लवकरच अधिकृत घोषणा होईल.मानांकनासाठी मसाल्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) कोल्हापुरी गूळ, चप्पल यांचाही प्रस्ताव पाठविला आहे. दुसऱ्या टप्प्यात चप्पल, गूळ यांना मानांकन मिळणार आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात आजरा घनसाळला प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक उपप्रदर्शन मानांकन मिळाले. पाठोपाठ आता कोल्हापुरी मसाल्याचाही सन्मान होणार आहे. आजरा घनसाळनंतर मसाल्यास मानांकन देण्यास केंद्राने तत्त्वत: मान्यता दिल्याचे येथील ‘आत्मा’ला कळविण्यात आले आहे.
कोल्हापुरी मसाल्यास मिळणार ‘मानांकन’
By admin | Updated: June 24, 2015 01:29 IST