कोल्हापूर : शहरवासीयांवर कोणत्याही प्रकारची नवीन करवाढ न लादता प्रशासनाने सादर केलेल्या १०९७ कोटी रुपयांच्या सन २०१५-१६च्या आर्थिक नियोजनात २४ कोटींची वाढ करून ११२१ कोटी रुपयांच्या आर्थिक नियोजन आराखड्यास सोमवारी झालेल्या महापालिकेच्या ‘विशेष सभेत’ मंजुरी देण्यात आली. शहरात मनपा व पोलीस प्रशासन असे मिळून पाच कोटी खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मनपाच्या स्वनिधीतून २.२४ कोटी रुपये खर्चून ‘शहर वाय-फाय’ करण्यात येणार आहे, अशी घोषणा स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अंदाजपत्रक सादरीकरणावेळी केली. ‘वायफाय’ झाल्यास कोल्हापूर हे कोलकातानंतरचे देशातील दुसरे ‘वाय-फाय’ सुविधा असणारे शहर बनणार आहे.येत्या आर्थिक वर्षात नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा नव्या कर्जाचा किंवा करवाढीचा बोजा न पाडता, नवीन २४ योजनांची घोषणा फरास यांनी सभागृहात केली. अनेक योजनांची घोषणा करताना ‘मानस’ असा गोंडस शब्द वापरला आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा मानस व्यक्त करताना त्यासाठी ठोस तरतूद केलेली नाही. ११ मजली इमारतीच्या अग्निशमन सुरक्षेसाठी आठ कोटींची टर्नटेबल लॅडर खरेदीसाठी १.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मात्र, रंकाळ्याच्या पडलेल्या भिंतीसाठी प्रशासनाने सुचविलेल्या एक कोटी रुपयांत दमडीची भर न घालता, रंकाळा पुन्हा राज्य व कें द्र सरकारच्या मेहरबानीवर सोडून दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.नवीन अर्थसंकल्पात ४४ लाख ६७ हजार रुपये शिलकीसह महसुली व भांडवली जमा ३८९ कोटी ४५ लाख ५४ हजार रुपये प्रशासनाने दाखविली होती. त्यामध्ये फरास यांनी २४ कोटींची वाढ करून एलबीटी, घरफाळा, पाणीपुरवठा, नगररचना व परवाना विभागाच्या उद्दिष्टांत वाढ केली. कें द्र व राज्य शासनाच्या मदतीने विशेष प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या योजनांसाठी स्वतंत्रपणे जमा ७०८ कोटी ५३ लाख १९ हजार ४९९ रुपये अपेक्षित निधीपैकी ६४४ कोटी १५ लाख चार हजार रुपये अपेक्षित खर्चाचा असे एकूण भांडवली, महसुली व विशेष प्रकल्पांसह ११२१ कोटी ९८ लाख ७४ हजार २१४ रुपयांच्या अंदाजपत्रकास सभागृहाने मंजुरी दिली. परिवहन सभापती अजित पोवार व प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते यांनी अंदाजपत्रक महापौरांच्या माध्यमातून सभागृहास सादर केले. (प्रतिनिधी)‘बीओटी’चा धडाकानिर्माण चौकात महापालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी भव्य इमारत, ताराराणी चौकात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शाहू क्लॉथ मार्केटचा विकास, सीबीएस परिसर व महालक्ष्मी मार्केट येथे मल्टिलेव्हल कार पार्किंग, सुभाष स्टोअर्सची जागा विकसित करणे, दवाखान्यांसाठी आरक्षित जागा खासगी तत्त्वावर दवाखान्यांना विकसित करण्यास देणे, आदी ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ प्रकल्पाच्या घोषणांचा धडाका अंदाजपत्रकात करण्यात आला.पानसरे, मंडलिक यांचे स्मारक उभारणारकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी पाच लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. पुरोगामी विचारांचा मानस्तंभ ठरेल, असे पानसरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे फरास यांनी सांगितले. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे उचित स्मारक करण्याची घोषणा फरास यांनी केली.स्मार्ट सिटी, पार्किंग व्यवस्था सुधारणे, महालक्ष्मी मंदिर व शहरातील पुतळे सुशोभीकरण, सक्षम आरोग्य यंत्रणा, गतीमान प्रशासन आदी प्रामाणिक प्रयत्नांना नगरसेवक, प्रशासन व शहरवासीय साथ देतील, अशी आशा आहे. - आदिल फरास, स्थायी समिती सभापतीनव्या योजनांचा पाऊसशहरातील सर्व महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित. पहिल्या टप्प्यात मनपा चार कोटी तर पोलीस प्रशासन एक कोटी असे मिळून पाच कोटी रुपये खर्चणार. उर्वरित रक्कम उद्योजक व समाजसेवी संस्थांकडून देणगी स्वरुपात उभारणार.महापालिकेची तीन मुख्य रुग्णालये, तर १४ वॉर्ड रुग्णालयांची रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी ६५ लाखांची तरतूद. पंचगंगा रुग्णालयात दंतचिकित्सा विभाग सुरू करण्यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली.चार विभागीय कार्यालयांचे सक्षमीकरण करून बांधकाम परवान्यांसह इतर महत्त्वाची कामे त्या-त्या कार्र्यालयांर्तगत निर्गत केली जाणार. कार्यालयांच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया एक एप्रिलपासून अमलात येणार.मराठा भवन बांधण्यासाठी २० लाखांची तरतूद. मनपाने आरक्षित केलेल्या जागेपैकी एक जागा मराठा भवनसाठी देण्याची घोषणा.शाहू मैदान चौक येथे ३ कोटींचा सब-वे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाईसाठी २० लाखबिंदू चौकातील पार्किंगची जागा विकसित करणे.शहरात एक हजार एलईडी दिव्यांच्या प्रायोगिक प्रकल्पासाठी २५ लाखटर्न टेबल लॅडरसाठी १.७० कोटींची तरतूदहेरिटेज वास्तू संवर्धनातून ऐतिहासिकस्थळी सौरवीज यंत्रणा.शहरातील पुतळे सुशोभीकरण व रोषणाईसाठी १५ लाखांची तरतूदसर्वधर्मियांच्या विविध स्मशानभूमींसाठी ६० लाखांची तरतूद.‘कोल्हापूर महोत्सवा’साठी २५ लाख.केएमटीला ३.५० कोटींचे आर्थिक सहाय्य.शहरात सामाजिक संस्थांच्या मदतीने एक रुपयात शुद्ध व प्रक्रिया केलेले पाणी मिळणार असून अशी पहिल्या टप्प्यात २० वॉटर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.परीट समाजासाठी धुण्याची चावी विकसित करण्यासाठी १० लाख रुपयांची मदत.अंबाबाई मंदिर परिसरात अत्याधुनिक एलईडी व लेसर विद्युत रोषणाई होणार.शहरातील ५४ उद्यानांचा खासगीकरणातून विकास.२० डास प्रतिबंधक मशीन खरेदी करणार.
कोल्हापूर होणार ‘वाय-फाय सिटी’
By admin | Updated: March 31, 2015 01:11 IST