मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित सनातन संस्थेच्या समीर गायकवाडला झालेली अटक व कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील वादामुळे चर्चेत आलेले कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोज शर्मा यांच्यासह ५ पोलीस अधीक्षक/ उपायुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. शर्मा यांची मुंबईला बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे नाशिक विभागाचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर गृहविभागाने गुरुवारी ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले. प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. प्रदीप देशपांडे यांच्या जागी वाशिमच्या अधीक्षक विनीता साहू यांची बदली झाली आहे. त्याशिवाय नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एम.के. भोसले यांची मुंबईला तर भंडाऱ्यांचे पोलीस प्रमुख डी.के. झळके यांची वाशिमच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकाची मुंबईत बदली
By admin | Updated: December 4, 2015 00:55 IST