शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला वळीवाने झोडपले

By admin | Updated: May 4, 2017 04:08 IST

गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या वळवाने अखेर बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली

मुंबई/कोल्हापूर : गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या वळवाने अखेर बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. कऱ्हाडसह परिसरात वादळी वाऱ्याने थैमान घातले.सुमारे तासभर झालेल्या गारपिटीने शहराला अक्षरश: झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. कोकणासह मराठवाड्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली. कधी नव्हे ते यंदा उष्णतेच्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्टाही होरपळून गेला आहे. कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले असताना दुसऱ्या वेळी वळीवाने परिसराला झोडपले.वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दसरा चौकातील जुने डेरेदार झाड, तर नागाळा पार्क येथील चिपडे सराफ यांच्या दारातील झाड भुईसपाट झाले. अनेक ठिकाण डिजिटल फलक तुटून पडले होते. सांगली शहरासह शिराळा, तासगाव तालुक्यात गारपीट झाली. तासगाव शहरासह सावळज परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दुपारच्या सुमारास शिराळा तालुक्यातील येळापूर, मेणीसह गुढे-पाचगणी परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. एक तास मुसळधार पाऊस पडल्याने नाले, गटारींसह ओढे भरून वाहत होते. कोकणात सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना पावसाने काहीसा दिलासा दिला. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले, शिरशिंगे व सांगेली या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातही हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे आठवडा बाजाराला आलेल्यांची तारांबळ उडाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)सांगलीत  शेतकऱ्याचा मृत्यूआष्टा (जि. सांगली) : येथील माणिक दत्तात्रय बावडेकर (वय ४३, रा. बसुगडे मळा) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील पळशी येथे वीज कोसळून डोंगरपायथ्याशी चरत असलेल्या १९ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. मराठवाडा : वीज पडून शेतकरी ठारउस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे अंगावर वीज पडल्याने चंद्रकांत जयवंता गाडेकर (५६) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. येणेगूरसह परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हिंगोली परिसरातही सायंकाळी पाऊस झाला. दहा मिनिटं झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद काही प्रमाणात भिजली़ आज विदर्भात वादळी पावसाची शक्यताविदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती या परिसरात गुरुवारी आकाश ढगाळ राहणार असून, गडगडाटी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़